Aftab Poonavalla Insta Chats : श्रद्धा वालकर हत्याप्रकरण, आरोपी अफताबचं इंन्स्टा चॅट समोर( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताबचं आणखी एक चॅट समोर आलंय.. श्रद्धा आणि त्याचा कॉमन मित्रासोबतचं हे इन्स्टाग्राम चॅट आहे.. श्रद्धाच्या हत्येनंतर चार महिन्यांनंतरचं हे चॅट आहे… मात्र या चॅटमध्ये श्रद्धाबाबत काहीच माहिती नसल्याचे आफताब या मित्राला भासवण्याचा प्रयत्न करतोय… आफताब आणि त्याच्या या मित्रामध्ये जवळपास १७ मिनिटे ३३ सेकंद संभाषण होतं… या संपूर्ण संभाषणात श्रद्धा कुठे आहे हे आपल्याला माहिती नाही असंच भासवण्याचा आफताब प्रयत्न करत असल्याचे उघड झालंय.. मे महिन्यात आफताबने श्रद्धाची हत्या केली होती.. मात्र श्रद्धा आपल्याला सोडून गेल्याचं आफताब या मित्रांना भासवतोय… आफताब आणि श्रद्धाच्या या कॉमन मित्राने हे चॅट आता पोलिसांना दिलंय.. पोलिसांनी त्याचा जबाबही नोंदवलाय..</p>

Related posts