ind vs nz, IND vs NZ ODI Series : भारत-न्यूझीलंडमधील वनडे मालिका कधी व कुठे होणार, जाणून घ्या… – ind vs nz odi series : know when and where india vs new zealand odi series will be held, know the all details( प्रगत भारत । pragatbharat.com)

ऑकलंड : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला आता सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये किती वनडेचे सामने होणार आहेत आणि ते कधी व कुठे खेळवण्यात येणार आहे, याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना हा २५ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. हा पहिला वनडे सामना ऑकलंडच्या मैदानात होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे. भारत व न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना हा हॅमिल्टनच्या मैदानात २७ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना हा ३० नोव्हेंबरला ख्राइस्टचर्च येथे खेळवण्यात येणार आहे. हा या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना असेल. कारण या मालिकेत तीव वनडे सामने खेळवण्यात येणार आहेत. हे तिन्ही वनडे सामने न्यूझीलंडमध्ये दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहेत.

भारताच्या वनडे आणि टी-२० या दोन्ही संघांमध्ये कमालीचा बदल आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, या दोन्ही संघांचे कर्णधार वेगवेगळे आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या हा भारताचा कर्णधार होता, पण आता वनडेमध्ये मात्र शिखर धवनकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वनडे संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

वनडे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ आहे तरी कसा, पाहा- शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सेन, अर्शदीप, शार्दूल ठाकूर,शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, दीपक चहर.

न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका भारताने जिंकली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा टी-२० सामना खेळवण्यात आला. हा सामना भारताने जिंकला आणि त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना हा पावसामुळे बरोबरीत सुटला. पण भारताने दुसरा सामान जिंकला होता आणि या मालिकेत या एकाच सामन्याला निकाल लागला. त्यामुळे या एका सामन्यातील विजयाच्या जोरावर भारताने मालिका १-० अशी जिंकली. या मालिकेत पावसानेच जास्त खेळ केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता वनडे मालिकेत पाऊस बेरंग करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Related posts