fake doctor arrested, दहावी नापास तरुणानं दवाखाना उघडला; पाईल्सची ऑपरेशन्स केली; ३६५० जणांवर उपचार केले अन् मग… – fake doctor allegedly treating patients arrested in telangana( प्रगत भारत । pragatbharat.com)

तेलंगणात एक तरुण अनेक वर्षांपासून कित्येक वर्षे कोणत्याही पदवीशिवाय डॉक्टर बनून फिरत होता. त्यानं दवाखाना उघडून अनेकांवर उपचार केले. या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्यानं काही जणांवर शस्त्रक्रिया केल्याचा संशय पोलिसांना आहे. जनगाव जिल्ह्यातील घनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शवनीपल्ली गावात हा प्रकार घडला. आकाश कुमार बिस्वास असं आरोपी तरुणाचं नाव आहे.

आकाश बिस्वास चार वर्षांपासून दवाखाना चालवत होता. मूळव्याध आणि फिस्टुलाचा त्रास असलेल्या रुग्णांवर तो उपचार करायचा. पोलीस आणि आरोग्य विभागाला त्याच्याविरोधात तक्रार मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जनगावमधील घनपूर येथील आरोपीच्या दवाखान्यावर छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीत त्याच्या शिक्षणाबद्दल महत्त्वाची माहिती उघडकीस आली. आरोपीचं शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाल्याचं कसून केलेल्या चौकशीत पोलिसांना समजलं.
चेहऱ्यावर लांब लांब केस; हनुमान समजून लोक करू लागले पूजा; एक दिवस अचानक…
पोलिसांनी आकाश बिस्वासच्या दवाखान्यातून स्टेथस्कोप, रबर स्टॅम्प, रुग्णांचं रजिस्टर, लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड, पॅम्पलेट, रेफरल शीट, ऍलोपथी आणि आयुर्वेदिक औषधं जप्त केली आहेत गेल्या १० वर्षांत आरोपीनं कोणत्याही पदवीशिवाय आणि संबंधित आरोग्य विभागाच्या कायदेशीर परवानगीशिवाय ३ हजार ६५० रुग्णांवर उपचार केले आहेत, असं टास्क फोर्सचे निरीक्षक व्ही. नरेश कुमार यांनी सांगितलं. आरोपी दहावीत नापास झाला. त्यानंतर त्याच्या आजोबांसोबत काम करू लागला. तेदेखील कोणत्याही वैध प्रमाणपत्रांशिवाय रुग्णांवर उपचार करायचे, अशी माहिती कुमार यांनी दिली.
दोघांना बोलावलं, एकांतात नेलं; फेविक्वीक टाकून संपवलं; दुहेरी हत्याकांडाचं गूढ अखेर उकललं
आरोपीविरोधात फसवणुकीसह अन्य गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आपण अनेक डॉक्टरांसोबत कम्पाऊंडर म्हणून काम केलं आहे. विविध डॉक्टरांसोबत काम केल्यानं आपल्याला अनुभव मिळाला. त्याच अनुभवाच्या आधारे दवाखाना उघडून लोकांवर उपचार सुरू केल्याची माहिती बिस्वासनं पोलीस चौकशीत दिली. आरोपीनं शस्त्रक्रियादेखील केल्या असाव्यात असा संशय पोलिसांना आहे.

Related posts