punjab crime, धक्कादायक! चार तरुणींकडून तरुणाचं कारमधून अपहरण; अज्ञातस्थळी नेऊन रात्रभर अत्याचार – laborer accused four girls of abducting them from car and kept physical relations forcefully in jalandhar( प्रगत भारत । pragatbharat.com)

चंदिगढ: पंजाबच्या जालंधरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री चार तरुणींनी अपहरण केल्याचा दावा एका कारखान्यात कामगार असलेल्या तरुणानं केला. तरुणीनं अज्ञातस्थळी नेऊन सामूहिक बलात्कार केल्याचा दावा त्यानं केला. तरुणींनी रात्रभर शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आपल्याला तिथेच टाकून सकाळी निघून गेल्याची आपबिती तरुणानं सांगितली. तरुणानं माध्यमांसमोर त्याची व्यथा मांडली.

जालंधरच्या लेदर कॉम्पेक्स रोडवर रविवारी रात्री कारमधून जात असलेल्या चार तरुणींनी कारखान्यातून घरी जात असलेल्या तरुणाचं अपहरण केलं. तरुणी त्याला अज्ञात ठिकाणी घेऊन गेल्या. तरुणींनी आपल्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तरुणानं केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप तरी कोणालाही अटक झालेली नाही.
दहावी नापास तरुणानं दवाखाना उघडला; पाईल्सची ऑपरेशन्स केली; ३६५० जणांवर उपचार केले अन् मग…
रात्री उशिरा काम संपवून घरी पायी निघालो होतो. लेदर कॉम्पेक्स रोडवरून जात असताना एक मोठी कार माझ्याजवळ येऊन थांबली. कारमधील चार तरुणींनी माझ्याकडे पत्ता विचारला. त्याचवेळी त्यांनी माझ्या नाकाला काहीतरी लावलं. मी बेशुद्ध पडलो. त्या मला कारमध्ये टाकून कुठेतरी घेऊन गेल्या, असा घटनाक्रम तरुणानं सांगितला.

अपहरण करणाऱ्या तरुणींचं वय २२ ते २३ वर्षांदरम्यान होतं. शुद्ध आली त्यावेळी तरुण निर्वस्त्र अवस्थेत होता. त्याचे हात पाय बांधलेले होते. सर्व तरुणींनी अनेक तास आपल्यासोबत जबरदस्ती केल्याचा आरोप त्यानं केला. जवळपास ११ ते १२ तास तरुणींनी मला त्रास दिला. घटनेची लाज वाटत असल्यानं तक्रार नोंदवली नसल्याचं त्यानं सांगितलं.
चेहऱ्यावर लांब लांब केस; हनुमान समजून लोक करू लागले पूजा; एक दिवस अचानक…
या प्रकरणी कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचं पोलीस प्रभारी गगनदीप सिंह सेखो यांनी सांगितलं. कोणी तक्रार नोंदवल्यास तपास करू अशी माहिती त्यांनी दिली.

Related posts