cidco Lottery 2022 Announced Navi Mumbai 4158 Houses ( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आलेल्या 4 हजार 158 घरांची सोडत आज पार पडली. बेलापूर येथील सिडको (Cidco lottery) मुख्यालयाच्या सभागृहात ही संगणकीय सोडत पार पडली. सिडकोच्या या घरांच्या सोडतीसाठी 16 हजार अर्ज आले होते. या सोडतीत घर लागलेल्या लाभार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून गेली अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना आपले हक्काचे घर लागल्याने लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय. तर ज्यांना घरे लागली नाहीत त्यांच्यासाठी उलवे नोडमध्ये घरांची लॉटरी काढण्यात आली असून त्यामध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन सिडको तर्फे करण्यात आले आहे.

सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना ऑगस्ट 2022 साठी संगणकीय सोडत सिडको भवन येथे काढण्यात आली. सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांनी सिडकोमुळे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी बोलून दाखवली.

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील 4,158 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. परवडणाऱ्या दरातील या 4,158 घरांपैकी 404 घरे (उत्पन्न मर्यादा – 0 ते 3 लाख) ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि उर्वरित 3,754 घरे (उत्पन्न मर्यादा तीन लाखांपेक्षा अधिक) ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.

महागृहनिर्माण योजना ऑगस्ट 2022  च्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम 15 दिवसांच्या कालावधीमध्ये परत केली जाईल, अशी माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे. 

News Reels

दरम्यान, कोकण म्हाडाच्या घरांसाठी देखील डिसेंबरमध्ये सोडत निघण्याची शक्यता आहे. तर ठाणे, विरारसह अन्य भागातील 4 हजारांहून अधिक घरांसाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत परवडणाऱ्या दरात आपलं हक्काचं घर घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळामार्फत ठाणे, विरार इत्यादी भागांत सोडतीच्या रूपात अधिकाधिक घरं उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकण मंडळामार्फत डिसेंबरअखेरपर्यंत सुमारे चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.   

महत्वाच्या बातम्या

MHADA Lottery : मुंबईत घर घ्यायचंय? कोकण म्हाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये सोडत काढण्याची तयारी 

Related posts