shraddha walkar murder case, I HAVE GOT NEWS! जग सोडण्यापूर्वी श्रद्धाचा शेवटचा मेसेज; काय सांगायचं राहून गेलं? – dude i have got news shraddhas last message to her friend on 18th may( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवीन माहिती उघडकीस येत आहे. प्रियकर आफताब पुनावालानं दिल्ली पोलिसांकडे हत्येची कबुली दिली. मात्र त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी अद्याप तरी पोलिसांकडे ठोस पुरावे नाहीत. श्रद्धाचं शिर पोलिसांना अद्याप तरी सापडलेलं नाही. त्यामुळे आफताबनं खून केलेली व्यक्ती श्रद्धाच होती हे सिद्ध करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे पोलीस सध्या ठोस पुरावे गोळा करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहेत.

श्रद्धाची १८ मे रोजी निर्घृण हत्या झाली. त्यानंतर आफताबनं तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीनं मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली. १८ मेच्या रात्री श्रद्धाची हत्या झाली. याच दिवशी संध्याकाळी ४ वाजून ३४ मिनिटांनी श्रद्धानं एका मित्राला मेसेज केला होता. मित्रा, मला एक बातमी मिळालीय, असं श्रद्धानं इन्स्टाग्राममध्ये मेसेजमध्ये म्हटलं होतं.
तुकडे, ठिकाणं… आफताबनं रफ नोटच्या माध्यमातून हिशोब ठेवला; आता पोलीस ‘हिशोब’ करणार?
मला एक बातमी मिळालीय. एका गोष्टीत मी खूप व्यस्त होते, असा मेसेज श्रद्धानं संध्याकाळी साडे चारच्या सुमारास मित्राला केला. संध्याकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी मित्रानं श्रद्धाला रिप्लाय दिला. बातमी नेमकी काय?, असा प्रश्न मित्रानं श्रद्धाला विचारला. मात्र त्या प्रश्नाला श्रद्धानं उत्तर दिलं नाही. यानंतर श्रद्धाच्या मित्रानं आफताबशी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला. मित्रानं आफताबला श्रद्धाची ख्यालीखुशाली विचारली. ‘भावा, कसा आहेस? कुठे होतास तू? तुझ्याशी बोलायचंय. श्रद्धाला मला फोन करायला सांग,’ असं मित्रानं आफताबला मेसेजमधून सांगितलं.

आफताबनं मेसेजला रिप्लाय केला नाही. त्यामुळे श्रद्धाच्या मित्रानं त्याला कॉल केले. मात्र तिथेही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. श्रद्धाकडून रिप्लाय न आल्यानं मित्र नाराज झाला. त्यानं २४ सप्टेंबरला संध्याकाळी सव्वा चार वाजता श्रद्धाला मेसेज केला. ‘कुठे आहेस तू? बरी आहेस ना?’ अशी विचारणा त्यानं केली. मित्रानं श्रद्धाशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र ते निष्फळ ठरले.
श्रद्धाला संपवल्यानंतर आफताब वसईत अन् ‘ते’ ३७ खोके दिल्लीत; अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार?
आफताबनं श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. त्याचा दुर्गंध पसरू नये म्हणून ३०० लीटरचा फ्रीज खरेदी केला. जवळच्या बाजारातील एका दुकानातून करवत आणून मृतदेहाचे तुकडे केले. जवळपास १० तास आफताब मृतदेहाचे तुकडे करत होता. सगळे तुकडे त्यानं फ्रीजमध्ये ठेवले. दररोज रात्री २ वाजता तो घराबाहेर पडायचा आणि महरौलीजवळ असलेल्या जंगलात मृतदेहाचा एक एक तुकडा फेकून यायचा.

Related posts