Delhi palam murder case Four members of family stabbed to death accused arrest

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Palam Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण (Shraddha Murder Case) ताजं असतानाच दिल्ली हत्येच्या एका घटनेने पुन्हा हादरली आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका मुलाने आई, वडिल, बहिण आणि आजीची निर्घृण हत्या करत संपूर्ण कुटूंबच संपवलं. हत्या केल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. दिल्लीतल्या (Delhi) पालम परिसरात ही धक्कादायक घटना घडली.  आरोपी मुलाचं नाव केशव असं असून तो 25 वर्षांचा आहे. (Four members of family stabbed to death in Palam)

अटक झाल्यानंतर भावाला दिली धमकी
आरोपी केशवला पोलिसांनी अटक केली, पण अटक करण्याआधी त्याने चुलत भावाला धमकी दिली. जेलमधून जेव्हा बाहेर येईन त्यावेळी तुझा नंबर असेल असं धमकावल्याचं चुलत भाऊ कुलदीप सैनी याने सांगितलं. केशवला आपल्या कृत्यावर अजिबात पश्चाताप नसल्याचंही कुलदीप सैनीने सांगितलं. 

कुलदीपने सांगितला तो थराराक प्रसंग
दिल्लीतल्या पालम परिसरात आपल्या कुटुंबासोबत रहाणाऱ्या केशवने मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आई-वडिल, बहिण आणि आजीची हत्या केली. केशव अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता.  केशवचं कुटुंब इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रहात होतं, तर त्याच्या काकाचं कुटुंब त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रहात होता. रात्री साधारण दहा वाजण्याच्या सुमारास चुलत बहिण उर्वशीचा आरडा-ओरडा ऐकू आला, ती कुलदीपला मदतीसाठी आवाज देत होती. आरडा ओरडा ऐकताच कुलदीप धावत पहिल्या मजल्यावर गेला. पण घराचा दरवाजा आतून बंद होता.

कुलदीपने दरवाजा खोलण्यास सांगतिलं, पण केशवने हा आमचा कौटुंबिक प्रशअन असल्याचं सांगत कुलदीपला तिथून जाण्यास सांगितलं. त्यानंतर केशव पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना कुलदीपने काही जणांच्या मदतीने त्याला पकडलं. यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आलं, पण जाता जाता त्याने कुलदीपला धमकी दिली. 10 ते 15 वर्ष जेलमध्ये राहिन आणि जेव्हा बाहेर येईन तेव्हा तुला संपवेन अशी थेट धमकी त्याने पोलिसांसमोरच कुलदीपला दिली.

घरात रक्ताच्या थारोळ्यात चार मृतदेह
हत्येच्या घटनेनंतर कुलदीप आणि त्याच्या कुटुंबियांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा एका खोलीत उर्वशी आणि आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर बाथरुममध्ये आई-वडिलांचे मृतहेत सापडले. कुलदीप सैनीने दिलेल्या माहितीनुसार केशव व्यसनासाठी आई-वडिलांकडून जबरदस्तीने पैसे घेत असे. घटनेच्या दिवशीही त्याने पैशांवरुनच आई-वडिलांशी भांडण केलं होतं. 

केशवची गुन्हेगारी पार्श्वभूमी
पाच वर्षांपूर्वी केशव बंगळुरुमध्ये एका कंपनीत काम करत होता. पण कंपनीतील काही महत्त्वाची कागदपत्र चोरल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एटीएम लुटीच्या घटनेतही त्याचा सहभाग होता. 

Related posts