japan beat Germany in fifa world cup 2022, फुटबॉल वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर, दिग्गज जर्मनीचा दारुण पराभव करत जपानने दिला धक्का – major upset in the fifa world cup 2022, japan beat giants germany by 2-1( प्रगत भारत । pragatbharat.com)

दोहा : FIFA World Cup मध्ये आज मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. कारण या विश्वचषकासाठी जर्मनीला प्रबळ दावेदार समजले जात होते. पण आजच्या पहिल्याच सामन्यात त्यांना मोठा धक्का बसला आहे.

आपला पहिलाचा सामना जर्मनी सहजपणे जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण आजच्या सामन्यात सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण जपानने या सामन्यात दिग्गज जर्मनीवर विजय साकारला आणि त्यामुळेच सर्वांना धक्का बसला. जर्मनीच्या संघाने या सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला पहिला गोल केला. जर्मनीच्या गुंडोगॉनने सामन्याच्या ३३व्या मिनिटाला गोल केला आणि त्यांना १-० अशी आघाडी मिळवता आली. या सामन्यात आघाडी केल्यावर जर्मनीच्या संआघाने जोरदार आक्रमण केले आणि त्याचबरोबर आपला बचाव कायम ठेवत त्यांनी मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम ठेवली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत जर्मनीचा संघ हा आघाडीवर होता. त्यामुळे आता दुसऱ्या सत्रात नेमकं काय होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

या सामन्याच्या दुसऱ्या सत्रातही जर्मनीने काही काळ आपल्याकडे वर्चस्व राखले होते. पण दुसरे सत्र अर्ध झाले आणि त्यानंतर संपूर्ण गेमच बदलल्याचे पाहायला मिळाले. कारण सामन्याच्या ७५ व्या मिनिटाला जपानच्या डोअनने पहिला गोल केला आणि त्यांना जर्मनीबरोबर १-१ अशी बरोबरी साधता आली. जपानसाठी ही मोठी गोष्ट होती. कारण हा सामना जपान पराभूत होईल, असे भाकीत यापूर्वी बऱ्याच जणांनी वर्तवले होते. पण त्यांच्या या गोलमुळे संघात चैतन्य निर्माण झाले.

पहिला गोल झाल्यावर जपानचा संघ चांगलाच चार्ज झाला आणि याचा परीणाम त्यानंतरही पाहायला मिळाला. कारण त्यानंतर सामन्याच्या ८३व्या मिनिटाला असानोने गोल केला आणि जपानच्या संघाने यावेळी २-१ अशी आघाडी घेतली. जपानने आघाडी घेतल्यावर स्टेडियममधील वातावरण बदलले. कारण जपानच्या चाहत्यांनी यावेळी जोरदार जल्लोष केला. जपानच्या संघाने दुसरा गोल केला आणि त्यानंतर त्यांनी एक मोठी गोष्ट केली. जपानने त्यानंतर आपला बचाव चांगला ठेवला आणि जर्मनीला एकही गोल करू दिला नाही.

Related posts