समलैंगिक विवाहाच्या विरोधात इक्वेडोरच्या World Cupमध्ये घोषणा, जर्मनीने केला कतारचा निषेध – fifa world cup controversy grows, germany protests in qatar and looks to avoid action against them( प्रगत भारत । pragatbharat.com)

दोहा : कतार विश्वचषकात आता एकामागून एक वाद वाढायला लागले आहेत. या वादाच आता जर्मनीचा संघही उतरला आहे. जर्मनीच्या संघाने आज कतारचा पहिला सामना सुरु होण्यापूर्वी जोरदार निषेध केला. पण हा निषेध करताना त्यांनी आपल्यावर कारवाई होणार नाही, याचीही काळजी घेतली. जर्मनीच्या संघाने एक ट्विट पोस्ट केले आहे, यामध्ये त्यांनी कतारचा अनोख्या स्पर्धेत निषेध केला आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असा संदेश त्यांनी कतारच्या विश्वचषकात संपूर्ण जगाला दिला आहे.

फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील मैदानाबाहेरील वाद थांबण्यास तयार नाहीत. ‘वन-लव्ह आर्म बँड’ वापरल्यास पिवळ्या कार्ड दाखवण्यात येईल, या ‘फिफा’च्या इशाऱ्यानंतर आता जर्मनीच्या संघाने तोंडावर हात ठेवून कतारमध्ये होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला. वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्यापूर्वी अंतिम संघाचे छायाचित्र ‘फिफा’च्या वतीने घेण्यात येते. या वेळी जर्मनीच्या संघातील सर्वांनी तोडांवर हात ठेवला. जर्मनी फुटबॉल महासंघाने हे छायाचित्र ट्वीट केले. त्यासोबत आर्मबँड असो वा नसो, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असेही त्यासोबत म्हटले आहे. कतारमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे; तसेच समलैंगिक विवाहास विरोध आहे. वन-लव्ह आर्म बँड बंदीच्या विरोधात जर्मनीचे मार्गदर्शक हॅन्सी फ्लिक आणि जर्मनीच्या फुटबॉल महासंघाचे प्रमुख बर्न्ड नेऊनदॉर्फ यांनी यापूर्वीच ‘फिफा’च्या पिवळे कार्ड दाखवण्याच्या निर्णयावर टीका केली होती. जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फिझर यांनी ‘फिफा’चे अध्यक्ष जिआनी इनफँटिनो यांच्यासह सामना बघितला. मात्र, या वेळी फिझर यांनी डाव्या हातावर सर्वांना दिसेल, असा ‘वन-लव्ह आर्मबँड’ परिधान केला होता.

इक्वेडोरची चौकशी
इक्वेडोरच्या चाहत्यांनी त्यांच्या वर्ल्ड कप लढतीच्या वेळी समलैंगिक विवाहाच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. त्याबाबत शिस्तभंगाची चौकशी सुरू होणार असल्याचे ‘फिफा’ने सांगितले. इक्वेडोर संघावर स्पर्धेपूर्वीच बाद होण्याचे संकट होते. त्यांनी राष्ट्रीय संघनिवडीसाठी अपात्र खेळाडूची निवड केल्याची तक्रार चिलीने केली होती. पात्रता स्पर्धेत त्यांना एका गुणाचा दंड करण्यात आला. मात्र, वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली.

Related posts