Restaurant Bill: सोशल मीडियावर 1985 सालचं हॉटेलच बिलं का व्हायरल होतेये? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Restaurant Bill : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक फोटो (Photo) आणि व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. हे फोटो आणि व्हिडिओ प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करत असतात. असाच एक फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोची  सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. हा फोटो एका हॉटेलच्या बिलाचा आहे? (Restaurant Bill) मात्र तुम्हाला नक्की असा प्रश्न पडला असेल की, या हॉटेलच्या बिलामध्ये असं काय आहे की ज्याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात. 

फोटोत काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो हॉटेलच्या जुन्या बिलाचा (Restaurant Bill) आहे. हे हॉटेल बिल 1985 या सालचं आहे. या बिलावर हॉटेलचं नाव, तारीख, ऑर्डर केलेल्या जेवणाचा मेन्यू आणि त्यांची किंमत लिहली आहे. अतिशय जून असं हे बिल आहे. 

व्हायरलं होण्यामागंच कारण काय?

साहजिक प्रत्येकालाच असा प्रश्न पडला असेल की हा फोटो व्हायरल होण्यामागच कारण काय? तर असं आहे की या बिलावर  (Restaurant Bill) ऑर्डर केलेल्या डिशेसचे नाव लिहले आहे. या ऑर्डरमध्ये ग्राहकाने शाही पनीर (shahi paneer) मागवलं आहे ज्याची किंमत 8 रूपये आहे, डाल मखणी (dal makhni) मागवली आहे ज्याची किंमत 5 रूपये आहे, रायता (raita)  मागवला आहे ज्याची किंमत 5 रूपये आहे, तर चपात्या ही मागवण्यात आल्या आहेत, ज्याची किंमत 6 रूपये. या एकूण या संपुर्ण बिलाची रक्कम 26 रूपये झाली आहे.  

मुळात 1985 साली वरील सर्व डिशेस मागवून त्याचं बिल 26 रूपये झाले आहे. आणि आजच्या काळात जर हॉटेलला (Restaurant Bill) जायचं म्हटलं तर खिशात 2 हजाराची नोट लागते. तसेच कदाचित 26 रूपयात हॉटेलमधली पाण्याची बॉटल देखील येत नाही. आणि वरती मागवलेल्या डिशेसची किंमत आता खुपच वाढली आहे. त्यामुळे 1985 पासून ते आता 2022 पर्यंत खुप बदल झाला आहे. महागाई कुठच्या कुठे पोहोचली आहे. 
 
दरम्यान गेल्या इतक्या वर्षात नेटकऱ्यांनी इतक स्वस्त हॉटेलच (Restaurant Bill) बिल कधी पाहिल नसेल, त्यामुळे या जुन्या बिलाचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर तुफान लाईक कमेंटस येत आहेत. तसेच अनेक युझर आपले अनुभव देखील शेअर करत आहेत. 

या फोटोवर कमेंट करताना एका युझरने लिहले की, “ओएमजी…तेव्हा ते खूप स्वस्त होते…हो नक्कीच त्या काळात पैशांची किंमत जास्त होती….”, तर दुसऱ्या युझरने लिहले की,”अहाहा! वो दिन भी क्या दिन थे. मी 1968 मध्ये अड्यारमध्ये 20 लिटर पेट्रोलसाठी 18.60 रुपये मोजायचो.टायरमधील हवा तपासण्यासाठी 10 पैसे द्यावे लागायचे असे अनुभव देखील अनेकांनी शेअर केले आहेत. या बिलाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या बिलाची (Restaurant Bill)  एकच चर्चा आहे. 

Related posts