Pune Crime News A 14 Year Old Boy Posted A Status On Instagram Case Has Been Filed Against The Boy Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News: मोबाईलमुळे लहान (Pune Crime) वयोगटातील मुलांवरदेखील परिणाम होत असल्याचं चित्र आहे. पुण्यात एका 14 वर्षीय शालेय विद्यार्थ्याने “माझी बायको होशील का?” असे स्टेटस इंस्टाग्रामवर (instagram) ठेवलं होतं. त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीसाठी त्यानं हे स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार कळताच मुलीच्या आईने थेट पोलिसांत धाव घेतली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागात एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या या 14 वर्षीय मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही एकाच शाळेत शिकायला असल्याने यातील मुलाने अनेक वेळा त्या मुलीकडे मैत्रीची मागणी केली होती. काही दिवसांपासून हा मुलगा त्या मुलीचा पाठलाग करीत आहे. तसेच मैत्री करण्यासाठी तिला वारंवार धमक्या द्यायचा. माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईल अशी धमकी ही त्याने या मुलीला दिली होती. त्या मुलीने मात्र काहीच उत्तर न दिल्यामुळे त्याने तिचा फोटो घेऊन “माझी बायको होशील का” असे स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवले अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे. 

‘माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईल’
मुलगा आणि मुलगी एकाच शाळेत शिकायला आहेत  तसेच ते एकाच ठिकाणी राहतात. मात्र मागील काही दिवसांपासून मुलगा पीडित मुलीचा पाठलाग करत होता. त्याला तिच्याशी मैत्रीदेखील करायची होती. त्यामुळे मैत्री करण्यासाठी तिला धमकावतदेखील होता. माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईल, अशी धमकीच त्याने मुलीला दिली होती. मात्र मुलीने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मुलाने तिचा दुरुन फोटो काढून इंस्टाग्राला स्टेटस ठेवला. 

पालकांंनी मुलांवर लक्ष देण्याची गरज
हा सगळा प्रकार अल्पवयीन मुलांसोबत होत असल्याने पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. येत्या काळात या सगळ्या घटनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता दाट आहे.  ज्या वयात हातात पुस्तक हवीत आता मुलांच्या हातात मोबाईल आले आहेत. नवं काहीतरी शिकण्याच्या किंवा मैदानावर जाऊन खेळण्याच्या वयात मुलं मोबाईलच्या आहार गेले आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय ते मोबाईलवर किती वेळ घालवतात याकडेदेखील लक्ष देण्याची गरज आहे. 

News Reels

Related posts