The Teacher Molested The 16-year-old Student( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News : पुण्यात शिक्षकी पेशाला (Pune) काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. चित्रकलेच्या शिक्षकाने 16 वर्षाच्या विद्यार्थिनीला (Pune crime) कामसुत्राचे फोटो दाखवून आणि मुलींना मुलांपेक्षा लग्न झालेली पुरुष आवडतात, असं सांगून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. निलेश नानासाहेब पवार असे 49 वर्षीय शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी 16 वर्षीय विद्यार्थीनीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. चित्रकलेच्या शिक्षकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. 

आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारिएगा, मैले हो जाएंगे’ हा डायलॉग  लोकप्रिय आहे.   घरी चित्रकला शिकवण्यासाठी आलेल्या चित्रकला शिक्षकाने (Drawing Teacher) आपल्या 16 वर्षाच्या विद्यार्थिनीला हा डायलॉग ऐकवला आणि तिला कामसुत्राचे फोटो दाखवून तिचा विनयभंग केला. तरुणीच्या स्टुडिओमध्ये 16 नोव्हेबरला संध्याकाळी हा प्रकार घडला.

या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा पुण्यात चित्रकलेचा (आर्ट) स्टुडिओ आहे. याच स्टुडिओत शिक्षक चित्रकलेचा क्लास घेण्यासाठी येतात. त्या दिवशी स्टुडिओत एकट्याच असताना चित्रकलेच्या शिक्षकाने हा प्रकार केला. त्यावेळी शिक्षकाने जॉनी राजकुमार यांचा तो लोकप्रिय डायलॉग म्हटला आणि कामसुत्रातील काही फोटो दाखवले. पायाला, हाताला घाणेरडा स्पर्श करुन पाय सुंदर असल्याचं म्हटलं. त्यावेळी विद्यार्थीनी राधाकृष्णच्या पेटिंगमध्ये रंग भरत होती. शिक्षकाने स्टुडिओची कडी आतून लावून घेतली.  विद्यार्थिनीला मिठीत घेऊन तू मला खूप आवडते, तू केस मोकळे सोडत जा, तू मोकळे केस असताना सुंदर दिसते, आताच्या मुलींना मुलांपेक्षा लग्न झालेली माणसं खूप आवडतात, असं म्हणत विद्यार्थिनीच्या पायाला स्पर्श केला, गालाला चिमटा घेतला आणि तिचा विनयभंग केला, असं विद्यार्थिनीने तक्रारीत नमूद केलं आहे. 

डॉक्टरही बनला नराधम 

News Reels

उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या डॉक्टरने पीडित तरुणीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होता. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. 19 वर्षीय तरुणी डॉक्टरांकडे उपचारासाठी आली होती. यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. अत्याचार करताना त्या तरुणीचे नग्नावस्थेत फोटो काढून घेतले. घडलेल्या प्रकारासंदर्भात कुटुंबीयांना अथवा कोणाला माहिती दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. 45 वर्षीय डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे.

Related posts