india squad announced for bangladesh tour, बांगलादेशच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, रवींद्र जडेजाच्या जागी कोणाला संधी मिळाली पाहा… – india squad announced for bangladesh tour, ravindra jadeja out of squad once again( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : बांगलादेशच्या दौऱ्यासाठी आता भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. कारण न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ बांगलादेशला जाणार आहे. या दौऱ्यात वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले होते. पण आता जडेजा या मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर यश दयालचे नावही या संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी आता भारतीय संघात वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि शाहबाझ अहमद यांचा समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेशच्या दौऱ्यामध्ये अता तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या दौऱ्यात दोन चार दिवसीय सामनेही खेळवण्यात येणार आहेत. या चार दिवसीय सामन्यांसाठी अभिमन्यू इश्वरनला भारतीय अ संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. या चार दिवसीय संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. आयपीएलमध्ये खेळणारा यजस्वी जैस्वालचा या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या संघाकडून सातत्याने धावा करणाऱ्या सर्फराझ खानलाचाही यावेळी या संघात समावेश करण्यात आला आहे. चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव हे अनुभवी खेळाडू या संघात असतील.

बांगलादेश दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.

पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सर्फराज खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतिथ सेठ

दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सर्फराज खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित शेठ, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, केएस भरत (यष्टीरक्षक).

न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ – शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, चहलदीप उमरान मलिक.

Related posts