Maharashtra News live Updates maharashtra marathi news breaking news live updates 24 November 2022 Thursday today marathi headlines political news mumbai news national politics news maharashtra live updates marathi news live updates( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

भावना गवळींविरोधात घोषणाबाजी, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांसह आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल  

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि आमदार नितिन देशमुखांसह ( Nitin Deshmukh) इतर काही जणांवर अकोल्याच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काल अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी ( Bhavna Gawli ) यांच्या विरोधात ‘गद्दार-गद्दार’ अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यावर आज रात्री  उशीरा अकोला जीआरपी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, जमाव जमवणे, एकत्रित येऊन घोषणाबाजी करणे, अश्लील भाषेत बोलणे अशा कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत.

धक्कादायक! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल 80 हजार 865 कोटी रूपयांची फसवणूक  

देशातील अग्रगण्य बँकेपैकी एक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत 1 जानेवारी 2017 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 80 हजार 865.34 कोटी रूपयांच्या फसवणुकीची तब्बल 22 हजार 722 प्रकरणे घडली आहे. त्यापैकी सर्वाधिक 6 हजार 939 प्रकरणे 2020 या करोना काळातील असून सामान्य काळापेक्षा हा आकडा चारपट अधिक असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे. महत्वाचं म्हणजे स्टेट बँकेच्या देशभरातील शाखेत 2017 ते सप्टेंबर 2022 या काळात 634.41 कोटींची फसवणूक झाली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती दिली आहे.  

अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेतील देशभरातील शाखांमध्ये 2017 मध्ये 2 हजार 324.37 कोटींच्या फसवणुकींची 1 हजार 302 प्रकरणे घडली आहेत. तर 2018 मध्ये 8 हजार 764.77 कोटींच्या फसवणुकींची 2 हजार 591 प्रकरणे घडली आहेत. 2019 मध्ये 34 हजार 628 कोटींच्या फसवणुकींची 5 हजार 488 प्रकरणे, 2020 मध्ये 23 हजार 773.64 कोटींची 6 हजार 939, 2021 मध्ये 6 हजार 132.30 कोटींच्या फसवणूकींची 4 हजार 109 प्रकरणे घडली आहेत. तर 1 जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंत 5 हजार 241.93 कोटींच्या फसवणुकीची 2 हजार 293 प्रकरणे घडली आहे. 

Bharat Jodo Yatra: ‘आम्ही जिंकलो, त्यांनी आमदार विकत घेतले’, राहुल गांधींचा मध्य प्रदेशात भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा प्रवास आता मध्य प्रदेशमध्ये सुरु झाला आहे. मध्य प्रदेशमधील बुरहानपूरमध्ये ही यात्रा पोहोचली असून यावेळी सभेला संबोधित करताना काँग्रेसने राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशात निवडणूक जिंकलो, आमचे सरकार होते. पण 20-25 भ्रष्ट आमदारांना  कोट्यवधी रुपये देऊन विकत घेतले गेले आणि त्यांनी सरकार बनवली. 

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली कारण सर्व लोकशाही मार्ग बंद होते. लोकसभा बंद पडली, निवडणुकीचा मार्ग बंद झाला आणि माध्यमांचा मार्गही बंद झाला. ते म्हणाले, ते (भाजप) आमदारांना विकत घेतात, माध्यमही त्यांचे आहेत. अशा परिस्थितीत आवाज उठवण्यासाठी काँग्रेसला हा प्रवास सुरू करावा लागला. ते म्हणाले की, सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे. आवाज उठवण्याच्या सर्व लोकशाही पद्धती बंद झाल्या. केवळ निवडणुकीच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही.

Related posts