stocks to buy these ultimate stocks can give you upto 23 percent returns know more federal reserve gh

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Stocks To Buy: सध्या खरेदी करण्यासाठी अनेक स्टॉक्स (Stocks) पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार (Investors) तज्ञंही आपल्या ‘या’ स्टॉक्समधून गुंतवणूक करण्याची संधी देत आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडेच आपल्याला मंदीचे वातावरण पाहायला मिळत असेल तरी शेअर मार्केटमध्ये (Share Market Today) तुम्ही चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण आहे त्यामुळे शेअर बाजारातही विविध चढ-उतार पाहायला मिळत आहेत. डाऊ जोन्स 95 अंकांनी (0.28%), S&P 500 0.59%, Nasdaq 0.99% वधारले आहेत. सध्या फेडरल रिझर्व्हनं (Federal Reserve) दिलेल्या घोषणेमुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेवरही (Reserve Bank of India) मोठा दबाव निर्माण होऊ शकतो. तरी फेडरल रिझर्व्हने जाहीर केलेल्या मिनिटांनंतर व्याजदरांबाबत मध्यवर्ती बँकेची भूमिका नरम राहण्याची शक्यता आहे. या भावनेमुळे अमेरिकन बाजारात तेजी दिसून आली. (stocks to buy these ultimate stocks can give you upto 23 percent returns know more federal reserve)

डॉलर निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरला आणि तो 106 वर घसरला. एसजीएक्स निफ्टीलाही गती मिळाली. सप्टेंबर तिमाही निकाल आणि कंपन्यांच्या कॉर्पोरेट विकासाच्या आधारावर अनेक समभाग आकर्षक दिसत आहेत. ब्रोकरेज हाऊसेसने दीर्घकालीन दृष्टीकोनातून काही दर्जेदार समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या दरम्यान पाहा तुम्ही कोणत्या स्टॉक्समध्ये पैसे गुंतवू शकता जेणेकरून तुम्हाला त्यातून 23 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. 

सुदर्शन केमिकल (Sudarshan Chemicals) 
टार्गट प्राईझ (Target Price) – 430 रुपये 
23 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) – 387 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 43 रुपये किंवा 11 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
टार्गट प्राईझ (Target Price) – 1120 रुपये
23 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) – 926 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 194 रुपये किंवा 21 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.

टाटा कझ्यूमर (Tata Consumer)
टार्गट प्राईझ (Target Price) – 925 रुपये
23 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) – 771 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 154 रुपये किंवा 20 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.

इंडिया हॉटेल्स (India Hotels)
टार्गट प्राईझ (Target Price) – 380 रुपये
23 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) – 318 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 62 रुपये किंवा 19 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.

इंडिया इलेक्ट्रॉनिक्स (India Electronics)
टार्गट प्राईझ (Target Price) – 130 रुपये
23 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) – 106 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 24 रुपये किंवा  23 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)

Related posts