Ncp Leader Ajit Pawar Criticism On Karnataka Cm  Basavaraj Bommai For Maharashtra Karnataka  Border Dispute( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते महाराष्ट्र मागायला निघाले आहेत काय? महाराष्ट्र काय त्यांना असा-तसा वाटला का? असे म्हणत अजित पवार बोम्मई यांच्या वक्तव्यावर चांगलेच संतापले. मुंबईत अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी बोम्मई यांनी सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यावर कर्नाटकचा दावा केल्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बसवराज बोम्मई यांना समज द्यावी

बसवराज बोम्मई यांनी कारण नसताना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासंदर्भात वक्तव्य केल्याचे अजित पवार म्हणाले. आज पुन्हा त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील काही गावासंदर्भात वक्तव्य केलं आहे. सातत्यानं ते विविध प्रकारची वक्तव्य करत आहेत. लोकांचं लक्ष् विचलीत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक भाषेत बसवराज बोम्मई यांना समज दिली पाहिजे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहेत. कन्राटकचे मुख्यमंत्री भाजपचेच आहेत असेही अजित पवार म्हणाले. याआधीच्या काळात अशा प्रकारची वक्तव्य होत नव्हती. आता महाराष्ट्राची मुंबईचं मागायची बाकी राहिलंय का काय? असेही अजित पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्राची जनता त्यांची अशी वक्तव्य कदापी सहन करणार नाही. त्यामुळं बोम्मई यांनी अशा प्रकारची वक्तव्य करु नये असेही अजित पवार म्हणाले.

राज्य सरकारनं भूमिका जाहीर करावी

लोकांचे लक्ष बेरोजगारी आणि महागाईवरुन हटवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत. कन्राटकने कायदेशी भूमिका मांडाव, चुकीची वक्तव्य करु नयेत असेही अजित पवार म्हणाले. आत काही कारण नसताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले ते तपासण्याची वेळ आली असल्याचे अजित पवार म्हणाले. याबाबत राज्य सरकारनं राज्याची ताबडतोब भूमिका जाहीर करावी असे ते म्हणाले. आपण अंधश्रद्धेला का खतपाणी घालतो हे कळत नाही. सत्य काय ते स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट करावं असेही अजित पवार म्हणाले. नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाची भेट घेतल्याच्या मुद्द्यावर अजित पवारांना विचारण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याबाबतची वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांनीचं स्पष्ट करावी असेही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

News Reels

Maharashtra Karnataka Border Dispute : अक्कलकोट, सोलापूरवरही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; ट्वीट करत फडणवीस यांच्यावरही टीका

Related posts