Dinesh Kartik Instagram post Retirement Rumors, थँक्यू दोस्तहो…दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तो VIDEO व्हायरल – dinesh kartik hints about his retirement from cricket his instagram post is viral watch video( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: भारताचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषक संघाचा भाग होता. पण आता ऑस्ट्रेलियामधून परतल्यावर काही दिवसांनी दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडीओमुळे एकच चर्चेला उधाण आले आहे. एकंदरीत या व्हीडीवरून आणि कॅप्शनवरून कदाचित त्याने अनऑफिशिअलपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले असल्याचे म्हटले जात आहे.

तामिळनाडूत जन्मलेल्या या क्रिकेटपटूने लांब कॅप्शनसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये टी-२० विश्वचषक खेळण्याच्या त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले आहे. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाजाने त्याचे स्वप्न साकार करण्यात मदत केल्याबद्दल त्याचे सहकारी, प्रशिक्षक, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. पाहूया काय म्हणाला कार्तिक…

वाचा: न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज धवनसाठी महत्त्वाची, गब्बरसमोर ही मोठी आव्हानं

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहिले, ” भारताकडून वर्ल्ड कप खेळणे ही खूप मोठी सन्मानजनक गोष्ट आहे. आम्ही आमच्या लक्ष्य पूर्ण करण्यापासून काही पावले दूर राहिलो. परंतु याने माझ्या आयुष्यात अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. माझे सहकारी, प्रशिक्षक, मित्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार.”


हेही वाचा: फिफा वर्ल्डकप दरम्यान मोठा धक्का, या स्टार फुटबॉलपटूवर दोन सामन्यांची बंदी

कार्तिकने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा एक मॉन्टेज शेअर केला आहे. कार्तिकचे सहकारी खेळाडू आणि कुटुंबातील काही सदस्य या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला इंग्लंडकडून १० विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. कार्तिकसाठीही ही स्पर्धा फारशी चांगली नव्हती. त्याची संघात फिनिशर म्हणून निवड झाली होती.

वाचा: ‘ही माझी टीम आहे…’, संजू सॅमसनला संधी न मिळाल्याच्या चर्चांवर हार्दिक पंड्या स्पष्टचं बोलला

या विश्वचषक संघात ऋषभ पंतपेक्षा कार्तिकला महत्त्व देण्यात आले होते. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात कार्तिकला केवळ एक धाव करता आली होती. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही केवळ सहा धावा केल्या. त्याचवेळी बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने सात धावांचे योगदान दिले होते. या अनुभवी यष्टीरक्षकाने तीन डावात केवळ एक चौकार लगावला. लीग स्टेजमधील खराब कामगिरीनंतर कार्तिकला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत अंतिम अकरा खेळाडूंच्या संघामध्ये स्थान मिळू शकले नव्हते.Related posts