Udayanraje Bhosale Sharp Attack On Governor Bhagat Singh Koshyari And Sudhanshu Trivedi( प्रगत भारत । pragatbharat.com)

Udayanraje Bhosale : आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जुने कसे झाले? राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावाला आधार काय? शिवरायांचे विचार जुने झाले, तर मुघलांना एकमेव शिवरायांनी विरोध केला होता. लोकांच्या सन्मानासाठी विरोध केला होता, गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी केला होता आणि हे म्हणतात छत्रपतींचा विचार जुना झाला, अशा शब्दात छत्रपती शिवरायांचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा समाचार घेतला. 

अनेक देशात योद्धे होऊन गेले पण साम्राज्यासाठी केल्या, पण शिवरायांनी गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी लढाया केल्या. आधुनिक भारताची संकल्पना त्यांनी त्यावेळीच मांडली होती. शिवाजी महाराज स्फूर्तीस्थान आहेत. आजपर्यंत कोणाचा आदर्श घेऊन वाटचाल झाली. त्रिवेदी म्हणाला माफी मागितली, यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? यांना लाज वाटत नाही का? हे सर्व वेदनादायी असून अशा वक्तव्यांनी चीड येते. शिवरायांनी सर्वधर्मसमभावाची मांडणी त्यांनी केली. धर्मस्थळांचा त्यांनी सन्मान केल्याचे उदयनराजे म्हणाले. 

 

 

News Reels

Related posts