china coronavirus, चीनमध्ये करोनाचा विस्फोट, थंडी वाढताच देशात पुन्हा लॉकडाऊनचे आदेश, परिस्थिती गंभीर – china’s daily covid cases hit record high since beginning of the pandemic, expands lockdown( प्रगत भारत । pragatbharat.com)

बीजिंगः चीनमध्ये करोना व्हायरस रुग्णांची संख्येत घट होताना दिसत नाहीये. गुरुवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार संसर्गाची साथ सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत करोना संसर्गाच्या आकड्याने उंच्चाक गाठला आहे. चीनमध्ये बुधवारी ३१ हजार ४५४ नवीन रुग्ण सापडले आहेत. ज्यातील २७ हजार ५१७ रुग्णांमध्ये कोणतेही नवीन लक्षणे नाहीयेत. चीनमधील सध्याची लोकसंख्या पाहता करोना रुग्णांचा हा आकडा फारच कमी आहे. मात्र, तरीही वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येने चीनमध्ये हाहाकार माजला आहे.

चार दिवसांपूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरला २६ हजार ८२४ रुग्णांची नोंद झाली होती. चीनमध्ये झिरो कोव्हिड पॉलिसी लागू करण्यात आली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन, चाचण्या आणि कठोर नियमांसाररखी पावलं प्रशासनाने उचलली आहेत. तीन वर्षांपासून चीनमध्ये करोनाचे रुग्ण घटताना दिसत नाहीयेत म्हणून अधिक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, या कठोर नियमांमुळं चीनी नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहेत. अनेक भागात नागरिक लॉकडाऊनविरोधात प्रदर्शन करत आहेत.

वाचाः मुलाच्या लग्नानंतर नवस फेडला, सरनाईकांकडून तुळजा भवानी चरणी ७५ तोळं सोनं अर्पण

चीनमधील ९२ टक्के लोकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. करोनाच्या वाढत्या संख्येमुळं राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्याचबरोबर एका शहरातून दुसऱ्या शहरात लोक प्रवास करु शकत नाही. तसंच, मोठ्या संख्येने मॉल, ऑफिस आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. शहरी भागातील २१ २१ मिलियन स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर, जवळपास ३.५ मिलियन नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनमुळं अनेक फॅक्टरींची कामे रखडली आहेत.

वाचाः मुलगी, जावई, मावशीसह संपूर्ण कुटुंब रमलेय चोरीत; पण एक चूक झाली अन् सापडले पोलिसांच्या जाळ्यात
लॉकडाऊनमुळं अनेक परदेशी कंपन्यांनाही फटका बसला आहे. त्यामुळं चीनची अर्थव्यवस्था मागील वर्षांच्या तुलनेत फक्त ३.९ टक्क्यांनी वाढली आहे. चीनने २०२२साठी ५.५ टक्क्यांचं लक्ष्य ठेवलं होतं.

वाचाः मुंबईतील प्रसिद्ध मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का, लवकरच पाडकामास सुरुवात करणार; कारण समोर

Related posts