Dapoli Sai Resort : दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टवर या वर्षात हातोडा नाहीच( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दापोलीतील बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ च्या मालकाला तूर्तास दिलासा देत हायकोर्टानं या रिसॉर्टवर कारवाई करण्यापूर्वी रितसर नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी रिसॉर्ट मालकानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, राजकीय पुढा-यांच्या वादात नाहक आपल्याला नोटीसा बजावल्या जात आहेत असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यावर गेल्या आठवड्यात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. ज्यात या प्रकरणातील मूळ तक्रारदार किरीट सोमय्या यांची हस्तक्षेप याचिका कोर्टानं स्वीकार करत त्यांनाही यात प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले आहेत.&nbsp;</p>

Related posts