husband kills wife, मला माफ करा! पत्नीची गयावया, पण अचानक आवाज थांबला; २६ दिवसांपूर्वी झाला होता लग्न सोहळा – husband takes life of wife after 26 days of marriage in ajmer( प्रगत भारत । pragatbharat.com)

अजमेर: राजस्थानच्या अजमेरमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. पतीनं पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह एका गोणीत भरला. त्यानंतर स्कूटरवरून गोणी घेऊन जात मृतदेहाची विल्हेवाट लावली. ख्रिश्चियन गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आंतरधर्मीय विवाहानंतर २६ दिवसांत पतीनं नवविवाहितेची हत्या केली.

मला माफ करा. आता असं होणार नाही, अशा शब्दांत पत्नीनं पतीसमोर गयावया केली. मात्र त्यामुळे पतीच्या काळजाला पाझर फुटला नाही. त्यानं पत्नीचा गळा चिरला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मुकेश सिंधी असं पतीचं नाव आहे. नया बाजारमध्ये त्याचं कपड्याचं दुकान आहे. २६ दिवसांपूर्वी मुकेशचं लग्न भगवान गंज येथील यूआयटी कॉलनीत राहणाऱ्या जेनिफरशी झालं. दोन वेगवेगळ्या जातींमधील असूनही त्यांचं अरेंज मॅरेज झालं.
भयंकर! आईसोबत अंगणवाडीत निघाला होता चिमुकला; वडिलांचा बिझनेस पार्टनर आला अन् अनर्थ घडला
बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास पती-पत्नीचा वाद झाला. मला माफ करा, मी पुन्हा असं वागणार नाही, असं जेनिफर म्हणत होती. मात्र काही वेळातच तिचा आवाज बंद झाला, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. मुकेश घरातून निघाला. त्याच्याकडे एक गोणी होती. स्कूटर ठेवताना गोणी खाली पडली. तेव्हा शेजाऱ्यांनी जेनिफरचा मृतदेह पाहिला आणि हा प्रकार पोलिसांना कळवला.

पोलिसांनी घराचं कुलूप तोडून गेट उघडला. त्यांना आत रक्ताचे डाग दिसले. तितक्यात मुकेश आला. पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला. मात्र पोलिसांनी त्याला पकडलं. चौकशीत त्यानं हत्येची कबुली दिली. जेनिफरचा मृतदेह पुष्करमध्ये फेकल्याचं मुकेशनं पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.
याला म्हणतात प्रेम! मृत प्रेयसीसोबत बांधली लगीनगाठ; कुटुंब, नातेवाईक सारेच गहिवरले
मुकेश आणि जेनिफरचा विवाह २६ दिवसांपूर्वी झाला होता. लग्न सोहळ्याला शेजारीदेखील उपस्थित होते. पती-पत्नी फारसे घराबाहेर पडत नसल्यानं शेजाऱ्यांनी सांगितलं. दोघांचा फार कोणाशी संवाद नव्हता. मुकेशनं तीन वर्षांपूर्वीच राहतं घर खरेदी केलं होतं. लग्नानंतर दोघे तिथे राहायला आले. मुकेशची आई त्याला एक-दोनदा भेटायला आली होती. या प्रकरणात पोलिसांनी मुकेशला अटक करण्यात आली असून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.

Related posts