man dies during sex with girlfriend dump body in plastic bag police investiget case bengluru story

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shocking News : सेक्स करताना अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेत देखील महिलेसोबत (women) सेक्स करताना एका 67 वर्षीय व्यक्तींचा (men) मृत्यू झाल्याची दूदैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे हादरलेल्या महिलेने नंतर त्याला रूग्यालयात नेण्याऐवजी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट (Men Dead Body) लावली होती. या घटनेचा उलगडा करण्यात आता पोलिसांना (Police) यश आले आहे. 

अनैतिक संबंध 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत झालेला 67 वर्षीय व्यक्ती हा एक व्यावसायिक (Businessman) होता, तर 35 वर्षीय महिला ही गृहिणी होती. या दोघांमध्ये अनैतिक संबंध (extra marital affair) होते. 16 नोव्हेंबरला व्यावसायिक (Businessman) तिच्या घरी संध्याकाळी 5 च्या दरम्यान गेला होता. यावेळी दोघांमध्ये शारीरीक संबंध निर्माण झाले. असे संबंध निर्माण करत असताना अचानक व्यावसायिकाचा मृत्यू झाला. व्यावसायिकांचा हा मृत्यू पाहून महिला देखील घाबरली होती. 

मृतदेहाची विल्हेवाट

सेक्स दरम्यान व्यावसायिकाचा (Businessman) मृत्यू झाल्याने महिला देखील घाबरली होती. तसेच पोलिसांना जर बोलावल तर त्यांच्या अनैतिक संबंधाची माहिती पोलिसांना कळणार होती. त्यामुळे तिने व्यावसायिकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. त्यानुसार महिलेने भावाला आणि पतीला फोन करून बोलावले. त्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून जेपी नगरमधील एका निर्जन भागात फेकून दिला.

पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा

दरम्यान मृत्यूच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच 17 नोव्हेंबरला पोलिसांना जेपी नगर भागात रस्त्याच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी लगेचच या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या मोबाईलची कॉल हिस्टरी आणि लोकेशन तपासले होते. या लोकेशनवरून तो त्याच्या मैत्रिणीच्या घरी असल्याचे शेवटचे आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी (Police) घटनास्थळी पोहोचून महिलेची चौकशी (Women Investigation) केली असता तिने सेक्स करताना व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती 

मृत्यूचे ‘हे’ आहे कारण? 

पोलिसांनी सांगितले की, 67 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू एपिलेप्टिक अटॅकमुळे म्हणजेच सेक्स दरम्यान ब्रेन स्ट्रोकमुळे (Brain Stroke) झाला आहे. तर महिलेचे म्हणण आहे की, सेक्स दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. सध्या या प्रकरणात शवविच्छेदन अहवालाची (post mortem report) प्रतीक्षा आहे, ज्यामुळे महिलेचा दावा खरा आहे की नाही हे सिद्ध होणार आहे. त्यामुळे या अहवालाची प्रतिक्षा असणार आहे. 

दरम्यान बेंगळुरूच्या (Bengluru) जेपी नगर भागात ही घटना घडली आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय. 

Related posts