Rajyapal Bhagatsingh Koshyari: कोश्यारी दिल्लीत, कानउघडणी की उचलबांगडी?( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेयत… राज्यपालांना हटवण्यासाठी आता दबाव वाढू लागलाय… शिवरायांचे वंशज उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यपालांना हटवण्याची मागणी केली… तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना पुढील दोन दिवसात हटवलं नाही तर महाराष्ट्र बंद करण्याबाबतही निर्णय घेऊ असा इशारा दिलाय.. तर सर्व महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र यावं असंही म्हटलंय… तर दुसरीकडे या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी हे दिल्ली दौऱ्यावर आहेत… त्यामुळे राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांची कानउघडणी होणार की उचलबांगडी हे पाहावं लागणार आहे.</p>

Related posts