Used Electric Devices Keeping old electrical appliances at home can harmful

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Old Devices:सध्याचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं (Information and Technology) युग मानलं जातं. बदलत्या युगाबरोबर तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत असून आपल्या रोजच्या व्यवहारिक जीवनातील एक महत्वपूर्ण भाग बनलं आहे. दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी आपण तंत्रज्ञानाची (Technology) मदत घेतो. मोबाईल, गिझर, वॉशिंग मशिन अशी अनेक उपकरणं आपल्या घरात असतात. पण प्रत्येक वस्तूला एक ठरविक मुदत असते. त्या वस्तूची कालमर्यादा संपली की त्यामुळे मोठं नुकसानही होऊ शकतं. त्यात जर ती वस्तू इलेक्ट्रॉनिक असेल तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवत असाल तर त्यामुळे होणारं नुकसानही जाणून घ्या.

जुने मोबाईल
सध्या प्रत्येक जण मोबालईचा (Mobile Phone) वापर करतो. पण एका ठराविक मर्यादेनंतर मोबाईल खराब होतो. बऱ्याच असे न वापरातले मोबाईल फेकून न देता घरीच ठेवतो. पण मोबाईलमध्ये वापरली जाणार बॅटरी ही लिथियमपासून (Lithium) बनलेली असते. काही काळानंतर ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जुने झालेले मोबाईल घरात ठेवल्यास नुकसान होऊ शकतं.

भिंतीवर असणारे जुने सॉकेट
प्रत्येकाच्या घरात इलेक्ट्रिक उपकरणं चालवण्यासाठी सॉकेटचा (Socket) वापर केला जातो. पण ती वर्षानुवर्ष वापरल्याने आतून खराब होऊ लागतात. त्यामुळे शॉर्ट सक्रिटसारख्या घटना घडण्याचीही शक्यता असते. विशेषत: घरात लहान मुलं असतील तर अशी जूनी आणि तुटलेली सॉकेट वेळीच बदलणं शहाणपणाचं ठरेल. 

बल्ब आणि ट्यूबलाईट
आपल्या घरातील बल्ब आणि ट्यूबलाईट (Bulb and Tubelight) खराब झाल्या तर तात्काळ भंगारात काढा. आपण वापरत असलेल्या बल्ब आणि ट्यूबलाईटमध्ये रासायनिक गॅस असतो, जो आरोग्याला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे बल्ब आणि ट्यूबलाईट खराब झाल्यास फार काळ घरात ठेऊ नका.

जूने चार्जर
मोबाईल चार्ज करण्यासाठी आपण चार्जरचा (Charger) वापर करतो, हे चार्जर फायबरपासून बनलेले असतात. त्याची कालमर्यादा संपूनही आपण वापरत असू तर ते धोकादायक ठरू शकतो. जूने चार्जर जास्त प्रमाणात गरम होऊ त्याचा स्फोट होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे वेळीच ते रिसायकल करावेत.

इतर गोष्टींप्रमाणे इलेक्ट्रिक वस्तूंचे स्वतःचे तोटे आणि फायदे देखील आहेत. म्हणूनच ते वेळेत योग्यरित्या वापरायला हवेत आणि वेळ संपल्यावर ते घरात जमा करुन ठेवण्याऐवजी त्याची योग्य विल्हेवाट लावावी.

Related posts