cristiano ronaldo scored goal in fifa world cup, FIFA World Cup 2022 : रोनाल्डोच्या गोलने श्रीगणेशा, पोर्तुगालचा घानावर दमदार विजय – fifa world cup 2022 : cristiano ronaldo scored goal and portugal beat ghana by 3-2( प्रगत भारत । pragatbharat.com)

दोहा: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालने घानावर दमदार विजय साकारला. या सामन्यापूर्वी रोनाल्डोला मँचेस्टर युनायडेटच्या संघाने संघाबाहेर केले होते. त्यामुळे या सामन्यात रोनाल्डो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण रोनाल्डोने या सामन्यात गोल केला आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्यामुळे पोर्तुगालला या सामन्यात घानावर दमदार विजय मिळवता आला.

या सामन्यातील पहिल्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पहिल्या सत्रात पोर्तुगालचा संघ चांंगला आक्रमक होता. पण त्यांना घानाच्या बचावपटूंनी गोल करण्यापासून रोखले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाही अशीच गोष्ट पाहायला मिळाली. पण अखेर सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनेल्टीवर गोल केला. हा पोर्तुगालसाठी पहिला गोल ठरला. पण त्यानंतर घानाचा संघ शांत बसला नाही. कारण त्यानंतर आठ मिनिटांनी घानाने गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटणार का, असे वाटत होते. पण घानाच्या गोलनंतर पाच मिनिटांनी, म्हणजेच सामन्याच्या ७८ व्या मिनिटाला पोर्तुगालच्या फेलिक्सने गोल केला आणि संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनी पुन्हा एकदा पोर्तुगालने गोल केला. सामन्याच्या ८०व्या मिनिटाला पोर्तुगालने अजून एक गोल करत आपली आघाडी वाढवली. पोर्तुगाल यावेळी ३-१ असा आघाडीवर होता. पण त्यानंतर सामन्याच्या ८९ व्या मिनिटाला घानाच्या बुकारीने गोल केला आणि त्यांनी पोर्तुलागच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. पण घानाला पोर्तुगालशी बरोबरी करता आली नाही. त्यामुळे हा सामना पोर्तुगालने ३-२ असा विजय मिळवला.

स्वित्झर्लंडचा दमदार विजय
चांगल्या चाली रचल्या, तरी त्याला ‘फिनिशिंग टच’ देणे गरजेचे असते. यात कॅमेरून संघ कमनशिबी ठरला. दुसरीकडे, शाकिरीच्या पासवर ब्रील एम्बोलो (४८ मि.) याने केलेल्या गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये कॅमेरूनवर १-०ने मात केली.

जागतिक क्रमवारीत स्वित्झर्लंड १५व्या, तर कॅमेरून ४३व्या क्रमांकावर आहे. मात्र, आफ्रिकेतील कॅमेरूनने क्रमवारी ही केवळ गौण असल्याचे आपल्या खेळाने दाखवून दिले. खेळाची सुरुवात वेगवान झाली. पहिल्या आठ मिनिटांत स्वित्झर्लंडने वर्चस्व राखल्यानंतर उत्साही कॅमेरूनच्या खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले. यामुळे कॅमेरूनला पूर्वार्धात दोन वेळा गोल करण्याच्या चांगल्या संधी होत्या. जीन-एरिक मॅक्सिम चोपो-माटिंग या कॅमेरूनच्या खेळाडूने काही अप्रतिम चाली रचल्या. मात्र, त्याचे तो गोलमध्ये रूपांतर करू शकला नाही. अर्थात, स्वित्झर्लंडला उत्तरार्धात त्याची दहशत जाणवलीच. आघाडीपटूंनीच नाही, तर कॅमेरूनच्या बचाव फळीने पूर्वार्धात भक्कम बचावही केला. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच स्वित्झर्लंडने गोल करून आघाडी मिळवली. यानंतर मात्र कॅमेरूनला बरोबरी काही साधता आली नाही.

Related posts