Ind Vs Nz New Zealand Won Toss And Decided To Field First Sanju Samson And Umran Malik Come Back In Team Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs New Zealand: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात संजू सॅमसनला बऱ्याच कालावधीनंतर संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यात उमरान मलिकचंही संघात पुनरागमन झालं आहे. 

या सामन्यापूर्वी टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात ऑकलंडमध्ये तब्बल 9 वेळा सामना खेळवण्यात आला आहे. ज्यामध्ये टीम इंडियानं केवळ 3 वेळा विजयाला गवसणी घातली आहे. म्हणजेच, या मैदानावर न्यूझीलंडचा थोडा वरचष्मा असल्याचं क्रिडा विश्लेषकांचं मत आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ आपला रेकॉर्ड सुधारत विजयाला गवसणी घालणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन 

न्यूझीलंड : फिन एलेन, डेवोन कॉनवे, केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, एडम मिल्ने, मॅट हेनरी, टिम साउथी, लॉकी फर्ग्यूसन

News Reels

टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल

ऑकलंडमधील हवामानाचा अंदाज

शुक्रवारी ऑकलंडमध्ये ढगाळ वातावरण आहे. वाराही सतत वाहत आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत होऊ शकते. तसेच, आज ऑकलंडमधील तापमान 18 अंश सेल्सिअस असेल. तसेच, आजच्या सामन्या दरम्यान पावसाची शक्यता नाही.

Related posts