IND v NZ 1st ODI LIVE updates, IND v NZ 1st ODI LIVE : भारताची कमान धवन आणि शुभमन गिलच्या हातात, भारताच्या पहिल्या डावाला सुरुवात – live cricket score ind vs nz 1st odi match india vs new zealand live streaming updates eden park auckland( प्रगत भारत । pragatbharat.com)

>> ५ षटकांनंतर, भारत – १६/०
कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल हे दोघे भारताकडून सलामीसाठी आले आहेत. शिखरकडून पहिल्या दोन षटकात २ चौकार लागवण्यात आले तर गिल धवनला साथ देत मैदानावर आपला जम बसवू पाहत आहे.

>> दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात दाखल झाले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे.

भारत: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन

उमरान मलिक आणि अर्शदीपचे पदार्पण
भारताचे दोन वेगवान गोलंदाज आज पहिला वनडे खेळणार आहेत. तुफानी वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि विश्वचषकात चांगली गोलंदाजी करणारा तुफानी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग खेळाडू आज वनडे सामन्यात पदार्पण करणार आहेत.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली
भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक गमावली आहे. न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

Auckland Weather Today – खेळपट्टी आणि हवामान
ऑकलंडमधील या मैदानावर रग्बीही खेळला जातो. हेच कारण आहे की सरळ सीमा खूपच लहान आहेत. विकेटच्या मागे या सीमा आणखी लहान होतात. अशा परिस्थितीत ही खेळपट्टी सूर्यकुमार यादवसारख्या फलंदाजाला साजेशी आहे. फिरकीपटूंना खेळपट्टीची मदत मिळू शकते. ढगाळ वातावरण असेल. मात्र पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान १८ अंशांच्या आसपास राहील.

IND vs NZ 1st odi Live – नमस्कार, महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉममध्ये आपले स्वागत आहे. गेल्या वेळी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आला होता, तेव्हा त्याने यजमान संघाचा टी-२० मालिकेत ५-० असा पराभव केला होता. पण, त्यानंतर न्यूझीलंडने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० आणि कसोटी मालिका २-० अशी जिंकली. यावेळी भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकून दौऱ्याची सुरुवात केली आहे. आजपासून दोन्ही संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आमनेसामने आहेत.

ऑकलंड – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. टी-२० मालिकेनंतर आता सीरिज कोणता संघ जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Related posts