Glenn maxwell on surya about big bash league, सूर्यकुमारला संघात घेण्याइतके आमच्याकडे पैसे नाहीत, दिग्गज क्रिकेटपटू हे काय बोलून गेला… – glenn maxwell on suryakumar yadav about big bash league in australia( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वचजण त्याच्या फलंदाजची वाहवा करत आहेत आणि जसजशा त्याला संधी मिळत आहेत, तो आपला फॉर्म दाखवून देण्यात मागे हटत नाही. मैदानावर येताच आपल्या शानदार फलंदाजीने चौकार- षटकारांचा पाऊस सुरु करतो. मग समोर गोलंदाज कोणीही असो सूर्या स्ट्राईकवर म्हणजे त्या गोलंदाजाची काही खैर नसते. सूर्यकुमार सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. आज जगभरातील दिग्गजांनीही सूर्याला एक जबरदस्त फलंदाज असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्याला विचारण्यात आले की सूर्यकुमार भविष्यात ऑस्ट्रेलियन देशांतर्गत बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये खेळताना दिसणार आहे का? यावर मॅक्सवेल म्हणाला की, सूर्यासारख्या खेळाडूला विकत घेण्यासाठी लीगमध्ये पैसे नाहीत.

वाचा: IND v NZ 1st ODI LIVE : भारत आाणि न्यूझीलंडच्या पहिल्या वनडे मॅचचे लाइव्ह अपडेट्स

‘सूर्यासाठी प्रत्येक खेळाडूला करारातून बाहेर काढावे लागेल’

मॅक्सवेलने ‘द ग्रेड क्रिकेटर’शी बोलताना ही माहिती दिली. बीबीएलमध्ये सूर्याला खेळवणाऱ्या मुद्दयावर गमतीशीरपणे हसत तो म्हणाला, ‘आमच्याकडे सध्या इतके पैसे नाहीत. याची कोणतीही शक्यता नाही. त्यासाठी प्रत्येक खेळाडूला काढून टाकावे लागेल. तसेच ऑस्ट्रेलियन संघातील प्रत्येक खेळाडूला करारातून काढून टाकावे लागणार आहे.

सूर्यकुमारने नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. सूर्याने ५१ चेंडूत नाबाद १११ धावा केल्या. या त्याच्या खेळीबद्दल मॅक्सवेल म्हणाला, ‘मला माहीतच नव्हते कि सामना सुरु आहे. पण नंतर मी स्कोअरकार्ड पाहिलं आणि अॅरॉन फिंचला फोटो पाठवला. मी विचारलं इथे काय चाललं आहे? सूर्या पूर्णपणे वेगळ्याच ग्रहावरची फलंदाजी करत आहे. इतर सर्व खेळाडूंचे स्कोअर बघा आणि या मुलाने ५० चेंडूत १११ धावा केल्या.

हेही वाचा: नियम तोडणं स्टार अष्टपैलूला पडलं महागात; एका वर्षासाठी निलंबित, भरावा लागणार लाखोंचा दंड

मॅक्सवेल म्हणाला, ‘मी दुसऱ्या दिवशी या सामन्याचा संपूर्ण रिप्ले पाहिला. तो इतर सर्वांपेक्षा अनेक पटीने चांगला खेळाडू आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे पाहणे खूप कठीण आहे. आपल्या आजूबाजूलाही त्याच्यासारखा खेळाडू नाही.

वाचा: थँक्यू दोस्तहो…दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तो VIDEO व्हायरल

सूर्यकुमारने टी-२० विश्वचषकात थैमान घातले

ऑस्ट्रेलियाने नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात सूर्यकुमारने धुमाकूळ घातला होता. त्याने ६ सामन्यात २३९ धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर होता. पण सूर्या सध्या आयसीसी टी-२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

Related posts