7th Pay Commission latest news for centarl Government Employees salary hike details

( प्रगत भारत । pragatbharat.com)

7th Pay Commission latest news: सरकारी कर्मचाऱ्यांचे (Government employees) पगार आणि कामाचं स्वरुप पाहून खासगी क्षेत्रात काम (Private sector jobs) करणाऱ्यांना कायमच त्यांचा हेवा वाटतो. तुम्हीआम्हीसुद्धा यापैकीच एक असू. अशा या सरकारी कर्मचाऱ्यांची इच्छा आता पूर्ण होताना दिसणार आहे. कारण, फिटमेंट फॅक्टरमध्ये (Fitment Factor) वाढ करण्याची तयारी टप्प्याटप्प्यानं पुढे जाताना दिसत आहे, ज्यामुळं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Governmnet jobs) मोठा फायदा होणार आहे. अर्थात यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार हे नक्की. 

सूत्रांच्या माहितीनुसार 2023 च्या अखेरीस यासंदर्भातील निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. सदर निर्णयामुळं केंद्राच्या सेवेत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार मोठ्या फरकानं वाढणार आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत मूळ वेतनामध्ये ही वाढ होणार आहे. 

Fitment Factor मध्ये नेमकी किती वाढ होणार? 

थोड्याथोडक्या फरकानं वाढणारा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता  (Dearness allowance) सध्या 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढच्या वर्षामध्ये त्यामध्ये आणखी दोन वेळा वाढ होणं अपेक्षित आहे. पण, कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना 7th Pay Commission अंतर्गतच फिटमेंट फॅक्टर वाढवून हवा होता. ज्यावर आता विचार होताना दिसणार आहेत. 

सध्या फिटमेंट फॅक्टरच्या (Fitment Factor) आधारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 18 हजार रुपये इतकं आहे. यामध्ये Fitment Factor 2. 57 पट इतका आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार वेतन आयोगाअंतर्गत तो वाढवून 3.68 पट इतका करावा. ज्यामुळं किमान मूळ वेतन 26 हजार रुपये इतकं होईल. केंद्राकडून मात्र यावर सुवर्णमध्य काढत हे प्रमाण 3 च्या घरात वाढवेल. अद्यापही यासंदर्भातील निर्णय मात्र प्रतिक्षेत आहे. 

Fitment Factor वाढल्यास पगार किती फरकानं वढणार? 

– समजा एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 18 हजार रुपये आहे, तर सध्याचे भत्ते सोडून त्यांचा पगार असेल 18,000 X 2.57= 46,260 रुपये. 
– फिटमेंट फॅक्टर जास्तीत जास्त पटीनं म्हणजेच  3.68 च्या पटीत वाढवल्यास पगार 26000X3.68= 95,680 इतका असेल. 
– 3 च्या पटीनं फिटमेंट फॅक्टर वाढल्यास मूळ वेतन असेल 21 हजार रुपये आणि अंतिम पगाराचा आकडा असेल 63,000 रुपये. 

हा एक घटक कसा वाढवतो पगार? 

7th Pay Commission मध्ये करण्यात आलेल्या तरतुदींनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा विविध भत्ते (Salary Allowances) आणि त्याशिवाय मूळ वेतन (Basic Salary), (Fitment factor) फिटमेंट फॅक्टरच्या आधारे निर्धारित होते. या सर्व घटकांमुळे कर्मचाऱ्यांचा पगार साधारण अडीच टक्क्यांनी वाढतो. 

Related posts