India Vs New Zealand 1st ODI India Gave 307 Runs Target To New Zealand( प्रगत भारत । pragatbharat.com)

Team India for IND vs NZ, 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर फलंदाजी आलेल्या भारताने दमदार फलंदाजी करत 300 पार धावसंख्या नेली आहे. सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावांचे आव्हान ठेवले आहे.

सामन्यात सर्वप्रथम टॉस जिंकत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजची खेळपट्टी बॅटिंग फ्रेंडली असल्याने भारताला स्वस्तात बाद करुन निर्धारीत लक्ष्य पूर्ण करण्याचा त्यांचा डाव होता. पण भारताने सामन्याची सुरुवातच दमदार पद्धतीनं केली. सलामीवीर शुभमन गिलसह कर्णधार शिखर धवन यांनी स्फोटक खेळी सुरु केली. दोघेही चांगल्या लयीत होते. दोघांनी शतकी भागिदारी पूर्ण करताच 50 धावांवर शुभमन गिल बाद झाला. ज्यानंतर काही वेळातच शिखर धवनही 72 धावांवर तंबूत परतला.

श्रेयसनं सावरला डाव

त्यानंतर भारताचे फलंदाज पटापट बाद होऊ लागले.पंत 15 सूर्यकुमार 4 धावा करुन बाद झाला. संजूने श्रेयससोबत डाव सावरला पण 36 धावा करुन संजूही बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरनेही 37 धावांची तडाखेबाज खेळी केली 3 सिक्स आणि 3 फोर त्याच्या बॅटमधून आले. पण या सर्वांमध्ये श्रेयसने 76 चेंडूत 80 धावांची सर्वाधिक खेळी करत भारताची धावसंख्या 300 पार नेण्यात मोलाची कामगिरी निभावली. न्यूझीलंडकडून लॉकी आणि साऊदी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले असून मिल्ने याने एक विकेट घेतली. आता 307 धावा करण्यासाठी न्यूझीलंड मैदानात उतरत आहे.

हे देखील वाचा- Related posts