Team India Batsman Sanju Samson Education Details( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanju Samson Education Details : टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज संजू सॅमसनच्या (Sanju Samson) फंलदाजीची चर्चा नेहमी होत असते. त्याच्या खेळाला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळत असते. त्याला टिम इंडियामध्ये स्थान मिळावे यासाठी चाहते बीसीसीआयवर दबाव टाकताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडियातही संजू सॅमसनची क्रेझ पाहायला मिळते. त्याच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया.

केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुलुविल गावात जन्मलेला संजूने आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. देशांतर्गत हंगाम आणि आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर संजूने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आणि खूप नाव कमावले. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आपल्या प्रभावी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी संजू एक आहे. संजू सॅमसनचा जन्म ११ नोव्हेंबर १९९४ रोजी केरळमध्ये झाला. त्याचे वडीलही फुटबॉलपटू होते. संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ संतोष ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळले होते.

टिम इंडियाचा फिनिशर हार्दिक पांड्याचे शिक्षण फारच कमी, ऐकून तुम्हाला विश्वास नाही बसणार

संजूला क्रिकेटर बनविण्यासाठी वडिलांनी सोडली नोकरी

स्फोटक फलंदाज संजू सॅमसनचे वडील दिल्ली पोलिसात होते. संजूचे बालपणही दिल्लीत गेले. तो पोलीस निवासी कॉलनीत राहत होता. संजूनेही आपले शिक्षण दिल्लीतूनच केले. संजूला शिखरावर पोहोचवण्यासाठी वडिलांनी नोकरीचा त्याग केला. संजू सॅमसनचे करिअर घडवण्यामागे त्याचे वडील विश्वनाथ यांचा मोठा हात आहे. खरंतर संजूला आयपीएस व्हायचं होतं. पण वडिलांनी संजूला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. संजू दिल्लीत १३ वर्षांखालील संघात स्थान मिळवू शकला नाही. तेव्हा वडिलांना वाटले की, मुलगा दिल्लीत क्रिकेटमध्ये प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी दिल्लीतील पोलीस हवालदाराची नोकरी सोडून केरळला परतले. तेथे संजू शाळा-कॉलेज स्तरावर खेळला आणि त्याने टीम इंडियापर्यंतचा प्रवास केला.

टिम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादवचे शिक्षण किती? जाणून घ्या

क्रिकेट करिअरविषयी

२८ वर्षीय संजू सॅमसनने २०१५ मध्ये भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणानंतर ६ वर्षांनी २०२१ मध्ये पहिला वनडे खेळला. संजू सॅमसनने ७ वर्षात केवळ २६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तर १० एकदिवसीय सामन्यांमध्ये २९४ धावा केल्या आहेत. टी २० फॉरमॅटमध्ये १६ सामन्यांच्या १५ डावांमध्ये त्याने २९६ धावा केल्या आहेत.

संजू सॅमसन २०१३ पासून सतत आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने १३८ आयपीएल सामन्यांमध्ये ३५२६ धावा केल्या आहेत. संजूच्या नावावर आयपीएलमध्ये ३ शतके आणि १७ अर्धशतके आहेत.

एकाच इयत्तेत ३ वेळा नापास, साजिद खान कितवी शिकलाय माहितेय का?

Related posts