Atharvashirsha Pathan Course In Savitribai Phule Pune University( प्रगत भारत । pragatbharat.com)

Savitribai Phule Pune University Course : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ( Savitribai Phule Pune University ) संस्कृत-प्राकृत विभागाकडून अथर्वशीर्ष पठणाचा ( Atharvashirsha Pathan ) समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. त्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी महाविद्यालयाची मदत घेण्यात आली आहे.  संस्कृत विषयाची गोडी वाढावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. अथर्वशीर्षाचा हा कोर्स ऑनलाईन पद्धतीचा असुन तो मोफत उपलब्ध करण्यात आला आहे.  या कोर्ससाठी अथर्वशीर्षाचे काही व्हिडीओ वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा अभ्यासक्र करणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने काही प्रश्नही विचारण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम 21 तासांचा असणार आहे.

दरम्यान, अथर्वशीर्षाचा समावेश सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यास महात्मा फुले यांच्या विचारांचे अभ्यासक हरी नरके यांनी विरोध केला आहे.

Related posts