Delhi Palam Boy Killed Family Members 25 Year Old Killed 4 From His Family 20 Stab On Father Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Boy Killed Family Members: श्रद्धा हत्याकांडानं (Shraddha Murder Case) संपूर्ण देश हादरला होता. त्यापाठोपाठच पुन्हा एकदा हत्याकांडानं दिल्ली हादरली होती. या हत्याकांडाचा आता उलगडा झाला आहे. दिल्लीतील (Delhi Crime) पालममध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा केशव यानं एकापाठोपाठ अनेकदा वडिलांवर चाकूनं हल्ला केला. आरोपीच्या वडिलांच्या अंगावर चाकूच्या 20 जखमा आढळून आल्या आहेत. पोलीस चौकशीत आरोपीनं बुधवारी सकाळी झालेल्या भांडणात वडिलांनी शिवीगाळ केल्याचं उघड झालं आहे. वडिलांनी शिवीगाळ केल्यामुळे आरोपी केशवला राग आला आणि रागाच्या भरात त्यानं वडिलांवर वार केले. 

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील पालममध्ये आरोपी केशवनं त्याचे वडील, आई, आजी, आणि बहीणीची हत्या केली होती. आरोपी केशव याला ड्रग्जचं व्यसन आहे.  बुधवारी संध्याकाळी घरात कोणी नसताना केशवनं पहिल्यांदा आजीची हत्या केली. त्यानं आजीकडे काही पैसे मागितले होते. तिनं पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यानं आजीची हत्या केली. यानंतर त्यानं वडील, नंतर आई आणि बहिणीची एकामागून एक हत्या केली. घटनास्थळावरून पळून जात असताना पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवनं तपासादरम्यान सांगितलं की, बुधवारी तो उशिरा उठला, त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला सुमारे 20 मिनिटं शिवीगाळ केली. केशवच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की, त्याच्याकडे नोकरी नाही, तो निरुपयोगी आहे आणि कुटुंबावर ओझं आहे. यानंतर केशव रागानं घराबाहेर पडला.

“चौकशीदरम्यानही केशव अतिशय उद्धटपणं उत्तरं देत आहे. त्यानं आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली, त्याचा त्याला कोणताही पश्चाताप नाही. चौकशीतही त्याच्या कुटुंबीयांची चूक आहे, असं काहीसं तो सातत्यानं सांगत होता. त्यानं चौकशीदरम्यान सांगितलं की, जेव्हा तो कुटुंबातील सदस्यांची हत्या करत होता, तेव्हा त्याला त्यांना अत्यंत निर्दयपणं मारावसं विचार होता. विशेषतः त्याच्या वडिलांना.”; अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

News Reels

आरोपीनं पोलीस चौकशीत सांगितलं की, “वर्षभरापूर्वी त्याचं प्रेयसीसोबत ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर त्याच्या भावना दुखावल्याचं केशवनं सांगितलं. यादरम्यान कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं त्याला साथ दिली नाही, असं असतानाही त्याच्या वडिलांनी त्याला शिवीगाळ केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवनं वडिलांवर 18-20 वेळा चाकूनं वार केले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Delhi Crime : पुन्हा एका हत्याकांडानं दिल्ली हादरली! एकाच घरात आढळले चार मृतदेह

Related posts