Symbolic Funeral Procession Of Karnataka Chief Minister By Shiv Sainiks In Kolhapur( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kolhapur News : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्मई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती नाला असा काढण्यात येत होती. दरम्यान, हे आंदोलन काही अंतरावर जाताच पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 

बोम्मईंच्या उलट्या बोंबा 

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले की, जत, अक्कलकोट व सोलापूरवर बोम्मई दावा करत कर्नाटकचा भाग असल्याचे सांगत आहेत. मात्र, चोराच्या उलट्या बोंबा असतात तशाच बोम्मई  यांच्या उलटड्या बोंबा आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा सुरु असताना त्याला छेद देण्याचे काम बोम्मई करत आहेत. कर्नाटकमधून येणाऱ्या बसेस बंद केल्या आहेतहा हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहे. 

कर्नाटक बसेसनाही विरोध 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर केलेल्या दाव्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेह ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या या वादानंतर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील एसटी बससेवा ही बंद केल्याचे वृत्त आहे. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज कोल्हापुरात सीबीएस स्थानकातील कर्नाटकच्या बस गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहित कर्नाटकच्या बस गाड्या महाराष्ट्रात येऊ न देण्याचे आवाहन एसटी प्रशासनाला केले.

महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही

दरम्यान, महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेली गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव आता केलेला नाही तर तो 2012 मधील आहे. आपण त्या गावांना पाणी देण्यासाठी आधीच म्हैसाळच्या सुधारित योजनेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असा टोलाही  फडणवीस यांनी लगावला आहे. 

News Reels

इतर महत्वाच्या बातम्या 

Related posts