home remedies for piles and constipation, Causes of Piles : तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? मग करा हे उपाय, पोट साफ न झाल्यास होऊ शकतो हा गंभीर आजार – these 5 poor hygiene habits can cause you to have hemorrhoids or constipation know the home remedies for it( प्रगत भारत । pragatbharat.com)

पाइल्स वा ज्याला मुळव्याध (hemorrhoids) म्हणतात ती एक अशी मेडिकल कंडीशन आहे जी सर्व वयाच्या लोकांना त्रस्त करते. ज्या लोकांना मूळव्याध असतो त्यांना मल त्याग करताना वा त्या वेळेस वेदना होतात, कधी कधी रक्त बाहेर पडते तर कधी कधी गुद्दद्वाराच्या आसपास खाज येते किंवा जळजळ होते. मुळव्याध म्हणजे गुद्दद्वार वा त्याच्या खालील बाजूस मलाशयाच्या जवळ सूज आलेला एक मांसाचा तुकडा असतो. हा तेव्हा तयार होतो जेव्हा गुद्दद्वार वा मलाशयाच्या आसपास असणाऱ्या रक्तांच्या पेशीवर दबाव वाढत जातो.

मुळव्याध होण्याला अनेक सवयी सुद्धा कारणीभूत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सवयीबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला नॉर्मल वाटू शकतात, पण नॉर्मल नसतात. ही अत्यंत उपयुक्त माहिती असून तुम्ही हा लेख नक्कीच वाचला पाहिजे.

टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसणे

मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसने उचित नाही. यामुळे मुळव्याध होऊ शकतो. टॉयलेट सीटवर बसल्याने मलाशायाच्या आसपास असणाऱ्या रक्तांच्या पेशींवर दबाव वाढत जातो, ज्यामुळे मल त्याग करणे सोप्पे होऊन जाते. पण जेव्हा तुम्ही जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसता ते सुद्धा एकाच स्थितीमध्ये बसता, तर दबाव वाढू लागतो. जो पुढे जाऊन मूळव्याध निर्माण करू शकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट असो त्यावर जास्त वेळ बसू नका.

(वाचा :- Yoga For Strong Bones : हाडे होतील लोखंडासारखी मजबूत व टणक, फक्त रोज न चुकता करा ही 5 कामे..!)

जास्त वजन उचलणे

अचानक जर तुम्ही जास्त वजन उचलले तर ग्त्यामुळे पोट वा गुद्दद्वाताच्या भिंती यावर दबाव पडतो. यामुळे रक्ताच्या नसा हळूहळू प्रभावित होऊ लागतात. यामुळे मुळव्याध होण्याचा एक मोठा धोका असतो. अशावेळी जर खुप जास्त वजन उचलणे जर तुमच्या कामाचा भाग असेल वा तुम्ही अवजड सामान वाहून नेण्याचे काम करत असाल तर तुम्ही थोडी काळजी घेतली पाहिजे. जिम मध्ये सुद्धा जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे मुळव्याध निर्माण होण्यापासून टाळता येईल.

(वाचा :- महाराष्ट्रात करोनानंतर गोवरचा भयंकर प्रकोप, सुरूवातीची ही लक्षणं घातक, करा हे उपाय)

दिवसातून अनेक वेळा शौचास जाणे

दिवसातून जर अनेक वेळा मल त्याग तुम्ही करत असाल वा तुम्हाला हगवण लागली तर यामुळे देखील मूळव्यधीचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला वारंवार मलत्याग करण्यास जाण्याची गरज भासत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि थेट डॉक्टरांना दाखवा. जर तुम्ही आता डॉक्टरांकडे गेलात नाहीत तर तुम्हाला नंतर मूळव्याध झाल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासुच शकते. त्यामुळे हे होऊच नये म्हणून आधीच वैद्यकीय उपचार घ्या.

(वाचा :- Surya Mudra Benefit : वेटलॉस, डायबिटीज, पोट साफ होणं, थायरॉइड, सर्दी-खोकला झटक्यात दूर होतील 15 रोग, करा हे 1 काम)

मसालेदार जंक फूड खाणे

मुळव्याधा मागचे मुख्य कारण आहे चुकीची आहार पद्धती! तुम्ही सुद्धा अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकले असेल की,”तिखट खाणे कमी कर नाहीतर मूळव्याध होईल.” आणि ही गोष्ट मंडळी अगदी खरी आहे. जे लोक जास्त मसालेदार वा तळलेले पदार्थ खातात वा जंक फूडच्या आहारी जातात त्यांना अन्य लोकांच्या तुलनेत मूळव्याध होण्याचा धोका खूप जास्त असतो. अशावेळी स्वत:च्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. मूळव्याध झाल्यावर डॉक्टर तेलकट आणि मसालेदार तिखट पदार्थ बंद करायला लावतात ते उगीच नाही. त्यामुळे ही सवय नक्की बदला.

(वाचा :- थंडीत हाडांच्या वेदना, गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, शरीर आकडणं याने आहात बेजार? ताबडतोब करा हे 5 घरगुती उपाय)

पाणी कमी पिणे

मानवी शरीर जवळपास 60 टक्के पाण्याने बनलेले असते. अशावेळी शरीरात जर पाण्याची कमतरता निर्माण झाली तर साहजिकच समस्यांचा डोंगर उभा राहू लागतो. यापैकी अनेक समस्या लगेच दिसून येत नाहीत. पण तोंडातून दुर्गंधी येणे, आळस येणे. मल अगदी ककडक होणे, बद्धकोष्ठता यांसाख्या समस्या उद्भवल्या की समजून जाये शरीरात पाणी कमी पडते आहे. अनेक लोक बद्धकोष्ठता नियंत्रित करण्यासाठी आहारात फायबरचा समावेश करतात, पण पाण्याची कमतरता असल्याने फायबर हे बद्धकोष्ठता अजून बिघडवते. यामुळे मूळव्याधीचा धोका वाढतो. अशावेळी दिवसातून किमान 6-8 ग्लास पाणी नक्कीच प्यावे.

(वाचा :- Heart Attack Sign: हार्ट अटॅक ठीक 1 महिना आधी देतो त्याच्या येण्याचे संकेत, ही 12 लक्षणे दिसल्यास व्हा सावध..!)

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Related posts