marathi actress sayali sanjeev write emotional note for father( प्रगत भारत । pragatbharat.com)

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सायली संजीव त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेते. ३० नोव्हेंबरला तिच्या वडिलांचं निधन झालं. सायली तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. अशात एक वर्षानी तिने तिच्या वडीलांसाठी एक पोस्ट लिहली आहे. गेल्याच वर्षी ३० नोव्हेंबरला तिच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झालं. सायली तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. दोघांचं एकमेकांशी अगदी घट्ट नातं होतं. एका मुलाखतीदरम्यान सायलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या मुलाखतीत सायली तिच्या वडिलांबद्दल भरभरुन बोलताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​काय आहे पोस्ट

या पोस्टमध्ये सायलीने तिच्या वडिलांसाठी तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू शहाणी होते मी, वेडा होता तू, बाबा, थांब ना रे तू बाबा, जाऊ नको दूर अशी पोस्ट लिहली आहे. या पोस्टवरुन तिचे वडिलांवर किती प्रेम होते हे दिसून येते. (वाचा :- Living Happy Married Life: या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, सुधा मूर्ती यांनी दिला गुरुमंत्र)

​काय होती सायलीची इच्छा

यावेळी तिने सांगितले की “बाबांबरोबरच्या असंख्य आठवणी आहेत. पण बाबांचं निधन होण्यापूर्वीची मी एक आठवण सांगते. एखाद्याची इच्छाशक्ती किती उत्तम असू शकते हे मला यावरून कळालं. बाबांचा कर्करोग बरा व्हावा म्हणून मी त्यांच्यावर उपचार करत होते. ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच माझी इच्छा होती.”

​बाबांनी गिफ्ट केली कार

सायलीने सांगितले की “त्यांच्यावर उपचार करायचे होते म्हणून मी गाडी घेऊ शकले नाही. कर्करोगाच्या उपचारासाठी सगळे पैसे लागणार होते. मी गाडी खरेदी करू शकले नाही हे बाबांच्या डोक्यात होतं. बाबांचं निधन होण्यापूर्वी त्यांनी पाडव्याला मला गाडी गिफ्ट केली. त्यावेळी त्यांना उठून बसताही येत नव्हतं. तरीही ते उठून बसले. आरटीजीएसच्या पेपरवर त्यांनी साईन केली. सगळे पैसे मला देऊन त्यांनी गाडी घ्यायला लावली. काहीही करून त्यांनी ती गाडी मला गिफ्ट दिली.” (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

​बाबांसोबत जास्त वेळ घालवा

बाबा त्यांच्या मनातील सर्वच गोष्टी बोलून दाखवत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाबांसोबत जास्त वेळ घालवू शकता. त्याच्यासाठी तुम्ही कायमच लहान राहाल. त्यामुळे तुमच्या बाबांचा विचार करा. जसं जसं माणसाचे वय वाढतं तसं त्याचा वागण्यात बदल येतात. त्यामुळे तुमच्या वडीलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. (वाचा :- या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, Sudha Murthy यांनी दिला गुरुमंत्र)

​त्याच्या उतारवयात त्यांना आधार द्या

तुमच्या वडीलांना त्यांच्या उतार वयात आधार द्या. त्यांना काय हवं नको ते पाहा यामुळे तुमच्यात एक हेल्दी नाते तयार होईल. हे सर्व करताना लहान मुलं आणि मोठी मुलं यांच्यात काही फरक नसतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. (वाचा :- केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी पुरुषांना हटके सल्ला, म्हणाले आनंदी राहयचं असेल तर ‘बायको जे बोलेल…’)

Related posts