Google Girl Riya Tiwari is in the third class but has as much knowledge as those doing PhD( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google Girl: मुलगी शिकली आणि प्रगती झाली असं म्हणतात. यूपीच्या गोंडा कोतवाली ग्रामीण भागातील सालपूर मार्केटमध्ये राहणाऱ्या रामधन तिवारीची ८ वर्षांची मुलगी रियाने आपल्या आईवडिलांसोबत राज्याचे नावही रोशन केले आहे. रियाला जगातील खंड, महासागरांची नावे, जगभरातील देश, त्यांच्या राजधानी आणि चलने, भारताची राज्ये आणि राजधान्या तोंडी आठवतात. रियाला भारतातील सर्व जिल्हे, भारतातील सर्व प्रमुख बंदरे, प्रमुख राष्ट्रीय उद्याने, भारतात वाहणाऱ्या प्रमुख नद्या, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची नावे लहानपणापासूनच लक्षात आहेत. त्यामुळे रियाला प्रश्न विचारणाऱ्यांकडे थक्क होण्याशिवाय पर्याय नसतो.

रियाला भारताचा शेजारी देश आणि सीमारेषेचीही माहिती आहे. रियाला तुर्किक राजवंश, गुलाम आणि मुघल घराण्यातील सर्व शासकांची नावे देखील आठवतात. रिया महेश्वर सूत्र, शिव तांडव आणि गीतेच्या सर्व श्लोकांचे पठण करते. संस्कृतमध्ये सर्वात कठीण मानले जाते. तिच्यासमोर एक पुस्तक ठेवले आहे आणि ती वाचून बोलतेय असाच एखाद्याला भास होऊ शकतो. त्यामुळेच आता लोक तिला गुगल गर्ल म्हणू लागले आहेत. तसेच रियाने प्रत्येक विषयात पीएचडी केली असेल असंही तिचे चाहते म्हणतात.

जगात मंदीचे वातावरण पण देशातील आयटी प्रोफेशनल स्वेच्छेने सोडतायत नोकरी; जाणून घ्या कारण
रियाचे वडील रामधन तिवारी हे जोतिया बेल्हारीमध्ये प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. रियाने २ वर्षांची असल्यापासून पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. रिया जी पुस्तकं पाहायची ती पूर्ण वाचायचा प्रयत्न करायची. तिच्या कुतूहलाशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही तीच द्यायची. तीक्ष्ण स्मरणशक्तीमुळे तिला एकदा वाचलेला विषय आठवतो. कबीर, तुलसीदास, सूर्यकांत त्रिपाठी निराला, सूरदास आणि पंतप्रधान मोदी यांचा जीवन परिचयही रियाला चांगला आठवतो. तिसरीत शिकणारी रिया इंटरमिजिएटपर्यंत सहज पुस्तके वाचू शकते. यावर्षी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रश्न रियाने सहज सोडवलते. रियाचे टॅलेंट पाहून लोकांना आश्चर्य वाटते.

रियाला शिक्षण विभागाची मदत

रियासारखी प्रतिभावंत जिल्हा परिषदेच्या शाळेत असणे ही शिक्षण विभागासाठी अभिमानाची बाब असल्याचे शिक्षणाधिकारी अखिलेश प्रताप सिंह यांनी सांगितले. लवकरच मी या मुलीला भेटणार असून विभागीय स्तरावरुन जी काही सोय असेल ती तिच्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. रिया पुढे जाऊन कुटुंबासह विभागाचा नावलौकिक मिळवू शकेल यासाठी प्रयत्न करु असे आश्वासनही त्यांनी दिले.

दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना जाहीर

Related posts