Ketu Gochar 2023 : आज मायावी केतू चित्र नक्षत्रात प्रवेश! ऑक्टोबरपर्यंत 5 राशींना किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करणंही पडेल महाग

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ketu Gochar 2023 : आजचा दिवस नक्षत्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. मायावी आणि अशुभ नक्षत्र केतू सध्या स्वाती नक्षत्रात आहे. पण आज तो चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आज संध्याकाळी 06.13 वाजता केतू चित्रा विराजमान होणार आहे. ऑक्टोबरपर्यंत तो चित्रा नक्षत्रात आहे. त्यामुळे पाच राशींना ऑक्टोबरपर्यंत आर्थिक आणि वैयक्तिक जीवनाबद्दल सतर्क रहावं लागणार आहे. कारण केतू गोचरमुळे पाच राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे. (ketu gochar 2023 nakshatra parivartan in chitra nakshtra today transit of ketu will affect 5 zodiac signs more careful till October) 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांना ऑक्टोबरपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे. करिअरमध्येही त्यांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहे. मानसिक स्थिती चांगली नसणार. या दिवसांमध्ये तुमची प्रतिष्ठा सांभाळा. 

कन्या (Virgo)    

या लोकांनी आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. बोलताना शंभर वेळा विचार करा कारण तुमचं एक शब्द तुमचं नातं खराब करु शकतं. आर्थिक स्थिती खराब होणार आहे. बचत करणेही तुम्हाला भारी पडणार आहे. 

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांनी ऑक्टोबरपर्यंत नातेसंबंधात काळजी घ्यावी. जोडीदारासोबत नात्यामध्ये कडुता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. तुमचं बँक बॅलेन्स गडबडणार आहे. 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांना केतू गोचरमुळे ऑक्टोबरपर्यंत आरोग्याची समस्या त्रासदायक ठरणार आहे. किरकोळ गोष्टी करतानाही काळजी घ्या. एकापाठोपाठ समस्या येत राहणार आहे. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडणार आहे. 

कर्क (Cancer)

केतू गोचरमुळे या राशीच्या लोकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घरातील व्यक्तीच्या प्रकृतीमुळे तुम्ही चिंतेत असणार आहात. ऑक्टोबरपर्यंत वैवाहिक जीवनातही समस्या जाणवणार आहे. घरातील वातावरण अस्वस्थ असणार आहे. 

 

हेसुद्धा वाचा – Weekly Money Horoscope : आठवड्याभरात पैशांनी भरेल तिजोरी! कोणत्या राशींचं नशीब पालटणार?

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.) 

 

Related posts