Home Remedies for Cold and Cough, Drink Ginger Tea; सर्दी खोकल्याला दूर ठेवते आल्याचे हे ड्रिंक, मिनिट्समध्ये तयार होणारा हा चहा आरोग्यासाठी वरदान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आरोग्यासाठी उत्तम आल्याचे गुण

आरोग्यासाठी उत्तम आल्याचे गुण

आल्यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण असून शरीराबाबबत अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास याची मदत होते. प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते शरीरावरील सूज कमी करण्यापर्यंत आल्याचा उपयोग करून घेता येतो.

(वाचा – Sleep Paralysis म्हणजे नेमके काय, दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर, जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय)

सर्दी – खोकल्यासाठी आले

सर्दी - खोकल्यासाठी आले

Ginger For Cough And Cold: सर्दी खोकल्यापासून सुटका मिळविण्यासाठी आल्याचा काढा करून पिणे योग्य ठरते.

  • हा काढा तयार करण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा सुकलेल्या आल्याची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चिमूटभर काळे मीठ आणि मूठभर तुळशीचे पत्ते घ्या
  • काढा बनविण्यासाठी एका पातेल्यात २ ग्लास पाणी घ्यात्यात तुळशीची पाने आणि अन्य साहित्य घालून पाणी मध्यम आचेवर उकळा
  • तुम्हाला हवं तर या काढ्यात १-२ लवंगही तुम्ही घालू शकता. काढा अर्धा उकळल्यावर खाली उतरवा गाळून कपात घ्या आणि दिवसातून २ वेळा याचे सेवन करा

(वाचा – थायरॉईडची ५ लक्षणे जी सांगतात हार्मोनचा स्तर झालाय कमी, गंभीर स्थिती असून वेळीच सावध व्हा)

आल्याचा काढा बनविण्याची दुसरी पद्धत

आल्याचा काढा बनविण्याची दुसरी पद्धत

तुम्हाला वरची पद्धत जरा जास्त मोठी वाटत असेल तर आल्याचा काढा अथवा चहा बनविण्याची दुसरी सोपी पद्धत म्हणजे पाण्यामध्ये तुम्ही आल्याचे लहान तुकडे करून घाला आणि पाणी उकळवा काही वेळा नंतर तुम्ही हा आल्याचा उकळलेला काढा प्या. यामुळे सर्दी आणि खोकला निघून जाण्यास मदत मिळते.

(वाचा – बोटं मोडण्याची सवय ठरू शकते घातक? सांधेदुखी होते की नाही, तज्ज्ञांकडून खुलासा)

आले आणि तुळशीचे पाणी

आले आणि तुळशीचे पाणी

सर्दी आणि खोकल्यासाठी अजून एक उपाय हवा असेल तर तुमच्या घरातील तुळशीची पाने आणि आल्याचे तुकडे पाण्यात उकळवून घ्या. मंद आचेवर साधारण ५ मिनिट्स काढा उकळू द्या.

त्यानंतर गरमागरम काढा प्या. आलं आणि तुळशीचे अँटीबॅक्टेरियल गुण या काढ्यात उतरतात, जे सर्दी आणि खोकल्याचे बॅक्टेरिया मारण्यास मदत करतात. त्वरीत बरे होण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

[ad_2]

Related posts