Banana Become Toxic When Eaten With Water As per Ayurveda Charak Samhita And Rules Of Eating Banana; केळं खाण्याची योग्य पद्धत आणि पाणी व दुधासोबत केळी खाल्ल्यास विषारी बनते असे आयुर्वेदात सांगितले गेले आहे | Maharashtra Times

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

1 तास पाणी पिऊ नये

1 तास पाणी पिऊ नये

आयुर्वेद सांगते की कोणत्याही फळाच्या सेवनानंतर लगेच पाणी पिऊ नये. हाच नियम केळी खाल्ल्यानंतरही लागू होतो. केळी पचनास जड असून पाण्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. केळी खाल्ल्यानंतर 1 तासानंतरच पाणी किंवा कोणतेही लिक्विड प्या.

(वाचा :- 5 Best Foods To Lower BP : ब्लड प्रेशर एक पॉईंट सुद्धा वाढू देत नाहीत हे 5 स्वस्त पदार्थ, औषधं होतात कायमची बंद)​

रात्रीची खाऊ नयेत केळी

रात्रीची खाऊ नयेत केळी

आयुर्वेदानुसार केळी रात्री खाऊ नये. हे फळ कफ वाढवणारे मानले जाते. म्हणूनच रात्री केळी खाल्ल्यास कफ, खोकला, छातीत जडपणा, छातीत दुखणे इत्यादीसमस्या उद्भवू शकतात. म्हणून दिवसाच केळी खावीत.
(वाचा :- Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान वयाच्या 17 वर्षांपासून होता इन्सुलिनवर, पण डायबिटीज 2 ला असा दिला चकवा)​

या गोष्टींसोबत केळी खाऊ नयेत

या गोष्टींसोबत केळी खाऊ नयेत

दूध-केळी किंवा केळीचा मिल्क शेक हा बॉडी बिल्डिंगसाठी घरगुती उपाय असल्याचे सांगितले जाते. पण आयुर्वेदानुसार हे कॉम्बीनेशन शरीरासाठी हानिकारक मानले जाते. वास्तविक, केळी, दूध-दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थ कफ वाढविण्याचे काम करतात.ते एकत्र केल्यावर, कफ दोष शरीरात वाढू शकतो आणि पचन यंत्रणा विस्कळीत होऊ शकते. न्यूट्रिशनिस्ट विपिन यांच्या मते, यामुळे त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात.
(वाचा :- गोल मटोल पोट, लटकणा-या मांड्या, छाती, हिप्सची चरबी झटक्यात जळेल, हा पदार्थ उपाशी पोटी खा निघेल पोटातील सर्व हवा)​

केळी खाण्याचे आयुर्वेदिक फायदे

केळी खाण्याचे आयुर्वेदिक फायदे

आयुर्वेदात केळी खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.

  1. केळी खाल्ल्याने लैंगिक उत्तेजना किंवा कामोत्तेजना वाढते
  2. मसल्स वाढतात
  3. भूक नियंत्रणात राहते
  4. चव वाढते
  5. लघवीच्या सर्व समस्या दूर होतात
    (वाचा :- या 3 भयंकर आजारांमुळे खाल्ल्यानंतर पोटातून येतो गुडगुडल्यासारखा आवाज, पोट हलकं ठेवण्यासाठी करा हे 8 घरगुती उपाय)​
    टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts