LPG Checking Trick : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिला? हे एका मिनिटामध्ये कळेल, कसं ते जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gas Cylinder check Trick News in Marathi : सकाळी घाईत टिफीन करतानाच अचानक सिलिंडर संपला की सर्वच वांदे होतात. तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल. त्या काळात स्वयंपाक करताना अनेक समस्या निर्माण होतात. तसेच काहीवेळा शेजारांकडून सिलिंडर घेण्याची वेळ येते.  मात्र आता यावर रामबाण उपाय म्हणजे एक सोपी पद्धत आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला लगेच लक्षात येईल की, सिलिंडर कधी संपणार आहे. सिलेंडरला ओला कपडला लावताच कमाल होईल. कसं ते जाणून घ्या…

बहुतेक लोक स्वयंपाकासाठी एलपीजी सिलेंडर वापरतात. गॅस पुरवठ्यामुळे प्रत्येक नागरिकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, अशा परिस्थितीत लोकांना एलपीजी सिलेंडर भरण्यासाठी पुन्हा जावे लागत आहे. कधी कधी जास्त गॅस वापरला जातो. ते पट्कन लक्षात येत नाही आणि अचानक गॅस संपतो. अचानक, सिलेंडप संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. 

वाचा: WhatsApp वरील Delete केलेले मेसेज पुन्हा कसे वाचाल? वापरा ‘ही’ सोपी ट्रिक

सिलेंडरला ओला कपडा गुंडाळा

दरम्यान, या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्यासाठी कोणत्याही रक्कमेची आवश्यकता नाही. सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, यासाठी गॅस सिलिंडरभोवती ओला कपडा लावा आणि सिलेंडर ओला झाल्यानंतर ते कापड काढा. 

जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला दिसेल की सिलेंडरचा काही भाग कोरडा आणि काही भाग ओला असल्याचे दिसून येईल. म्हणजेच ज्या भागामध्ये गॅस शिल्लक नाही तो भाग म्हणजे कोरडा राहिल. या सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे तुम्हाला सहज कळू शकते. यासाठी दोन-तीन दिवसांतून एकदा ही युक्ती करुन बघा म्हणजे ते पाहून तुम्ही वेळेत सिलेंडर बुक करू शकता. 

रिकामी जागा द्रव  वायूपेक्षा गरम असतो

रिकामा भाग तुलनेने भरलेल्या द्रव वायूपेक्षा जास्त गरम असतो. अशा परिस्थितीत, ओल्या कपड्याच्या संपर्कात आल्यावर संपूर्ण सिलेंडर ओला होतो, परंतु रिकामा भाग लवकर कोरडा होतो. दरम्यान, अशी वेळ येते जेव्हा सिलिंडरवर स्पष्टपणे दिसून येते की काही भाग सुकल्यानंतरही ओला आहे. अशा प्रकारे, किती गॅस शिल्लक आहे याची कल्पना येऊ शकते.

Related posts