[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ग्रीन टी सुद्धा पिऊ शकता
चेरिस इंडियाचे फाऊंडर परिमल शाह म्हणतात की, ग्रीन टी सुद्धा तुम्हला पोटाची चरबी कमी करण्यात मदत करू शकते. ग्रीन टी मध्ये अनेक अशी तत्वे असतात जी फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वाढवतात. त्या प्रक्रियेला वेग देतात. ग्रीन टी मध्ये एपिगेलोसेटचिन गेलेट नावाचं अँटीऑक्सीडेंट असते जे मेटाबोलिज्मला दुरुस्त करते. शिवाय हे एक कॅफिन सुद्धा आहे जे कॉफीतील कॅफिनपेक्षा कमी असते पण वेटलॉससाठी व चरबी जाळण्यासाठी मात्र खूप प्रभावी असते. EGCG आणि कॅफीन फॅट पेशींना (ऍडिपोसाइट्स) रक्तप्रवाहात चरबी एकत्रित करण्यात मदत करण्यासाठी शक्ती देतात जिथून जमा झालेली चरबी ऊर्जेच्या स्वरूपात वापरली जाऊ शकते. ग्रीन टी प्यायल्यास वजन कमी करण्यात खूप मदत मिळते. त्यामुळे रोजचा चहा काही काळ बाजूला ठेवून तुम्ही ग्रीन टी प्यायला सुरुवात करू शकता.
(वाचा :- केळं खाल्ल्यावर 1 तास चुकूनही करू नये हे काम, पोटाच्या उडतात चिंधड्या, महर्षी चरकनी हजारो वर्ष आधी लिहिले सत्य)
ग्रीन टी अन् मध
परिमल शहा यांच्या मते, मध हा एक आयुर्वेदिक पदार्थ आहे आणि आयुर्वेदात मधाला खूप मोठे स्थान आहे. रिफाईंड साखर तुमचं शरीर आतून पोखरते त्यामुळे त्याजागी मध वापरणं सर्वात हेल्दी पर्याय आहे. तुम्ही कोणत्याही पौष्टिक पदार्थांसोबत मध खाल्ले तर त्याचा दुहेरी फायदा शरीराला होतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने त्यातील अँटी सॅल्युलाईट गुणधर्मांमुळे झोप चांगली लागते. यामुळे आपले पोट फुगत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. याशिवाय मध हे एक नैसर्गिक एनर्जी बुस्टर सुद्धा आहे. मध थोडेसे जरी खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते आणि आपली भूक नियंत्रणात राहते व शरीरात अधिक कॅलरी जमा होत नाही. एकंदरीत वाढत्या वजनाला रोखले जाते. काही लोक म्हणतात की ग्रीन टी ला काहीच चव नसते किंवा ती कडू असते. म्हणूनच त्यात मध टाकून प्यायल्यास तिची चव खूपच स्वादिष्ट लागते शिवाय वजनही लवकर कमी होतं.
(वाचा :- 5 Best Foods To Lower BP : ब्लड प्रेशर एक पॉईंट सुद्धा वाढू देत नाहीत हे 5 स्वस्त पदार्थ, औषधं होतात कायमची बंद)
[ad_2]