[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
गैरसमज 1: मोतीबिंदू फक्त वृद्धांना प्रभावित करतो
वस्तुस्थिती: मोतीबिंदू वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक सामान्यपणे आढळत असला तरी, तो कोणत्याही वयात विकसित होऊ शकतो. आनुवंशिकता, डोळ्यांना होणारा आघात, मधुमेह आणि दीर्घकाळापर्यंत स्टिरॉइडचा वापर यासारख्या काही कारणांमुळे आयुष्याच्या सुरुवातीला मोतीबिंदू होण्याचा धोका वाढू शकतो. तुमचे वय कितीही असो, मोतीबिंदू शोधण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
(वाचा :- नसांत साचलेलं मेणासारखं चिकट Cholesterol झटक्यात पडतं बाहेर, रक्त होतं साफ,आठवड्यातून एकदा खा न शिजवता ही गोष्ट)
गैरसमज 2: मोतीबिंदू रोखता येतो
वस्तुस्थिती: सध्या, मोतीबिंदू पूर्णपणे रोखण्याचा कोणताही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध मार्ग नाही. तथापि, जोखीम कमी करण्यासाठी आणि त्यांची वाढ कमी करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता. यामध्ये सनग्लासेस लावून आपल्या डोळ्यांचे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणोत्सर्गापासून संरक्षण करणे, अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध निरोगी आहार राखणे, धूम्रपान सोडणे आणि मधुमेहासारख्या आजाराचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे ह्या गोष्टी समाविष्ट आहेत.
(वाचा :- झटक्यात पोट साफ व मूळव्याध होईल छुमंतर, पोटावर साचलेले चरबीचे टायर फुग्यासारखे चटकन् फुटतील, फक्त प्या हा चहा)
गैरसमज 3: आयड्रॉप्स टाकून किंवा औषधांनी मोतीबिंदू बरा होऊ शकतो
वस्तुस्थिती: आयड्रॉप्स टाकून किंवा औषधांनी मोतीबिंदूचा उपचार केला जाऊ शकत नाही. मोतीबिंदूवर एकमेव प्रभावी उपचार म्हणजे शस्त्रक्रिया. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान, धूसर झालेली नैसर्गिक लेन्स इंट्राओक्युलर लेन्स (IOL) नावाच्या कृत्रिम लेन्स इम्प्लांटने बदलली जाते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही एक सुरक्षित आणि अत्यंत यशस्वी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये दरवर्षी जगभरात लाखो शस्त्रक्रिया केल्या जातात.
(वाचा :- Human Body Fact: मानवी शरीराच्या या दोन अवयवांची अगदी मरेपर्यंत होत असते रोज वाढ, चक्क विज्ञानानेच केला खुलासा)
गैरसमज 4: मोतीबिंदू शस्त्रक्रिया धोकादायक आणि वेदनादायक असते
वस्तुस्थिती: मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही जगभरातील सर्वात सामान्यपणे केल्या जाणार्या शस्त्रक्रियांपैकी एक आहे आणि ती सुरक्षित प्रक्रिया मानली जाते.ही विशेषत: डे केअर सर्जिकल प्रक्रिया म्हणून केली जाते, म्हणजे तुम्ही त्याच दिवशी घरी जाऊ शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारे रुग्णाला धोका असू शकत नाही हे सिद्ध झाले आहे.
(वाचा :- या 7 पदार्थांमुळे शौच दगडासारखा कडक होतो व नसांना येते सूज, पोट साफ न झाल्याने होतो मूळव्याध, वाहू लागतं रक्त)
गैरसमज 5: मोतीबिंदूचा केवळ दृष्टीवर परिणाम होतो
वस्तुस्थिती: मोतीबिंदूचा प्रामुख्याने दृष्टीवर परिणाम होत असला तरी त्याचा तुमच्या जीवनातील इतर पैलूंवरही लक्षणीय परिणाम होऊ शकतो. मोतीबिंदूमुळे गाडी चालवणे, वाचन करणे किंवा दैनंदिन क्रियाकलाप करणे आव्हानात्मक होऊ शकते. याशिवाय अनेकदा रात्रीचे पाहण्यात ही अडचण येऊ शकते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया केवळ तुमची दृष्टी सुधारते असे नाही तर तुमच्या जीवनाची एकूण गुणवत्ता देखील वाढवते.
(वाचा :- BP Diet : मशीन न वापरताही ही 12 लक्षणं दाखवतात ब्लड प्रेशरची लेव्हल, 10 दिवसांत होतो नॉर्मल, फक्त खा हे पदार्थ)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]