[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
डायजेस्टिव सीड्स
मुखवास मिक्श्चर जर तुम्ही जेवणानंतर खात नसाल तर हे खाण्याची सवय लावून घ्या, कारण असे मुखवास हे पचनासाठी खूप चांगले मानले जाते आणि पोटासाठी उत्तम काम करते. जेवण झाल्यानंतर याचे सेवन केल्याने पित्त आणि वात दोष संतुलित होतात. मुखवास मिक्श्चर बनवण्यासाठी बडीशेप, ओवा आणि तीळ समान प्रमाणात मिक्स करून घ्यावेत.
(वाचा :- मोतीबिंदूचं रूपांतर काचबिंदूत होईपर्यंत राहू नका गाफिल, डोळे वाचवायचे असतील तर डॉ. रक्षिताचे हे सल्ले फॉलो करा)
रिकाम्या पोटी उषापान करा
चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदात उषापान एक उत्तम उपाय असल्याचे म्हटले आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी सर्वात आधी कोमट पाणी प्या. यामुळे पोट साफ होईल, बद्धकोष्ठता दूर होईल आणि पचनशक्ती वाढेल आणि पोट हलके होईल. लक्षात ठेवा की एक ग्लासपेक्षा जास्त कोमट पाणी पिऊ नका.
(वाचा :- नसांत साचलेलं मेणासारखं चिकट Cholesterol झटक्यात पडतं बाहेर, रक्त होतं साफ,आठवड्यातून एकदा खा न शिजवता ही गोष्ट)
मुग डाळीचा वापर
हिरवी मूग डाळ आहारात समाविष्ट करणे आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे हे शरीरासाठी निरोगी ठरते. याशिवाय, हे सहज पचण्याजोगे पौष्टिक अन्न आहे, जे वजन कमी करण्यास मदत करते.
(वाचा :- झटक्यात पोट साफ व मूळव्याध होईल छुमंतर, पोटावर साचलेले चरबीचे टायर फुग्यासारखे चटकन् फुटतील, फक्त प्या हा चहा)
हर्बल चहा
जर तुम्ही लठ्ठपणा, पीसीओडी, वंध्यत्व, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांनी त्रस्त असाल तर हर्बल चहा प्या. हा चहा बनवण्यासाठी, स्वयंपाकघरातील मसाले वापरा, जे तुमच्या शरीराच्या आयुर्वेदिक स्वभाव आणि दोषानुसार आहेत. ते नक्की काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञांची मदत घ्या.
(वाचा :- Human Body Fact: मानवी शरीराच्या या दोन अवयवांची अगदी मरेपर्यंत होत असते रोज वाढ, चक्क विज्ञानानेच केला खुलासा)
मैद्याचे सेवन कमी करा
चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला मैद्यापासून पूर्णपणे दूर राहावे लागेल. तुम्ही मैदा आणि मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन पूर्णपणे थांबवले पाहिजे.. हा साधा सोप्पा सल्ला ही वजन कमी करण्यात खूप मदत करतो.
(वाचा :- या 7 पदार्थांमुळे शौच दगडासारखा कडक होतो व नसांना येते सूज, पोट साफ न झाल्याने होतो मूळव्याध, वाहू लागतं रक्त)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]