IND Vs WI T20 Squad Team India Squad T20 Series Against West Indies Hardik Pandya Captain Surya Kumar Yadav Vice Captain

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Team India T20 Squad : वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या पाच टी 20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

अजित आगकर याच्या अध्यक्षत्येखाली आज भारतीय संघाची निवड करण्यात आली. रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यासारख्या सिनिअर खेळाडूंना आरम देण्यात आला आहे. तर यशस्वी जायस्वाल, तिलक वर्मा, आवेश खान, मुकेश कुमार यांना भारतीय संधी देण्यात आली आहे. अर्शदीप सिंह, संजू सॅमसन आणि कुलदीप यादव यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

भारतीय संघ –

इशान किशन (विकेटकिपर) , शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार

Ishan Kishan (wk), Shubman Gill, Yashasvi Jaiswal, Tilak Varma, Surya Kumar Yadav (VC), Sanju Samson (wk), Hardik Pandya (C), Axar Patel, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Ravi Bishnoi, Arshdeep Singh, Umran Malik, Avesh Khan, Mukesh Kumar

सामन्याची वेळ काय ?

भारतीय वेळेनुसार, कसोटी सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. तर एकदिवसीय सामने सात वाजता सुरुवात होणार आहेत. टी20 सामन्याला रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. 

2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला आहे. 12 जुलैपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघात सिनिअर खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. वर्कलोड मॅनेज करण्यासाठी टी20 मध्ये दिग्गजांना आराम देण्यात आला आहे. 

वेस्ट इंडिज दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक – 

कसोटी सामने (संध्याकाळी साडेसात वाजता)

12 ते 16 जुलै 2023 – पहिला कसोटी सामना
ठिकाण – विंडसर पार्क, डोमिनिका

20 ते 24 जुलै 2023 – दुसरा कसोटी सामना 
ठिकाण – क्विन्स पार्क ओव्हल पोर्ट , त्रिनिदाद

वनडे सामने – (संध्याकाळी सात वाजता) 

27 जुलै 2023 – पहिला एकदिवसीय सामना
ठिकाण – किंग्सटन, ओव्हल बारबाडोस

29 जुलै 2023 – दुसरा एकदिवसीय सामना
ठिकाण – किंग्सटन, ओव्हल बारबाडोस

1 ऑगस्ट 2023 – तिसरा एकदिवसीय सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

टी 20 सामने (संध्याकाळी 8 वाजता)

3 ऑगस्ट 2023 – पहिला टी20 सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

6 ऑगस्ट 2023 – दुसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना

8 ऑगस्ट 2023 – तिसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना

12 ऑगस्ट 2023 – चौथा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा 

13 ऑगस्ट 2023 – पाचवा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा 



[ad_2]

Related posts