Weight Loss Drink Cinnamon Cumin And Coriander Water Can Reduce Fat How To Make; वजन कमी करण्यासाठी वापरा दालचिनी-धणे आणि जिऱ्याचे पाणी, त्वरीत दिसेल फरक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दालचिनीचे गुण

दालचिनीचे गुण

दालचिनीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असून वजन कमी करण्यासाठी याची अत्यंत मदत होते. याशिवाय दालचिनी इन्सुलिनचे उत्पादन करण्यास सुधारणा आणते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे अगदी डायबिटीसच्या रूग्णांसाठीही वजन कमी करताना याचा फायदा होतो.

वजन कमी करण्यासाठी जिरे

वजन कमी करण्यासाठी जिरे

जिरे अनेक पोषक तत्वांनी भरलेले आहे. दालचिनीप्रमाणे जिरेदेखील वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. जिऱ्यामुळे जेवण पचायला मदत मिळते आणि वजन नियंत्रित राहण्यासही मदत मिळते. तसंच मेटाबॉलिजम वाढवून शरीरातील कार्ब्सचे उर्जेत रूपांतर करते आणि वजन कमी होते. अपचनाशी संबंधित समस्या दूर करून भूक नियंत्रणात राखण्यास जिऱ्याचा उपयोग करून घेता येतो, यामुळे वजन कमी होते.

(वाचा – पोटाची चरबी जाळण्यासाठी उपाशीपोटी खा भिजवलेले चणे, आरोग्यदायी फायदे)

धणे करतात वजन कमी

धणे करतात वजन कमी

धन्याचे पाणी ज्याप्रमाणे सर्दी खोकल्यासाठी उपयोगी आहे तसंच वजन कमी करण्यासाठीही याचा अधिक फायदा होतो. धन्याचे पाणी पिण्यामुळे पचनक्रियेत सुधारणा होऊन वजन कमी करण्यात मदत मिळते. तसंच धन्याच्या पाण्यामुळे पोटातील गॅस आणि अपचन बरे होण्यास फायदा मिळतो.

अनेक जण दालचिनी, धने आणि जिरे याचे वेगवेगळे पाणी करून पित असतील. पण या तीन पदार्थांचे मिश्रण करून पाणी पिण्याने वजन कमी करण्यास अधिक फायदा मिळतो.

(वाचा – १४० किलो वजन असणाऱ्या अर्जुन कपूरने १५ महिन्यात घटवले, लटकत्या पोटाच्या चरबीनंतर मिळवले अ‍ॅब्ज)

कसे बनवाल दालचिनी, धने आणि जिरे पाणी

कसे बनवाल दालचिनी, धने आणि जिरे पाणी
  • एक ग्लास पाण्यात दालचिनी तुकडा, जिरे आणि धणे घाला
  • रात्रभर हे असंच पाण्यात भिजू द्या
  • सकाळी हे पाणी उकळा आणि गाळून उपाशीपोटी प्या
  • रोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी पिण्याने वजन झर्रकन कमी होण्यास मदत मिळेल

(वाचा – पाण्यात मिसळा हे 5 पदार्थ, पोटात चिकटलेली सर्व घाण जाईल त्वरीत बाहेर)

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर व्यायामासह तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी दालचिनी, जिरे धन्याचे पाणी प्यावे. रोज या पाण्याच्या सेवनाने कॅलरी आणि पोटावरील चरबी जाळण्यास मदत मिळते. मात्र केवळ या पाण्याने वजन कमी होत नाही. यासह आहार, डाएट आणि व्यायामाचीही जोड द्यावी लागते.

[ad_2]

Related posts