[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
शरीराच्या स्थितीत बदल
अभ्यासकांनी दिलेल्या विश्लेषणानुसार, झोप आणि लोकांच्या वागण्यातील वेगवेगळेपणामुळे शरीरावर नक्की काय परिणाम होतो ते दिसून आले. ज्या व्यक्ती शरीराने अधिक सक्रिय होत्या आणि कमी वेळ झोपत होत्या (६ तासापेक्षाही कमी), त्यांना अधिक शारीरिक आजार उद्भवले. या तुलनेत ८ तास झोप घेणाऱ्या व्यक्तींचे शरीर अधिक मजबूत असलेले आढळले.
(वाचा – पोटावरील चरबी जाळून त्वरीत वजन घटविण्यासाठी प्या हिरवा ज्यूस, आजारांनाही ठेवेल दूर)
३ गटांमध्ये वाटप
या अभ्यासादरम्यान अनेक प्रश्न विचारण्यात आले. आठवड्यातून किती वेळा उशीरा झोपता? यानंतर अगदी कमी झोप असणाऱ्या व्यक्ती ज्या ६ तासापेक्षा कमी झोपता, मध्यम झोप घेणाऱ्या व्यक्ती ज्या साधारण ६ ते ८ तास झोपतात आणि अधिक काळ झोपणाऱ्या व्यक्ती ज्या ८ तासापेक्षा अधिक काळ झोपतात असे ३ गट करण्यात आले. यामध्ये कमी झोप घेणाऱ्या व्यक्ती कमी सक्रिय असल्याचे दिसून आले.
(वाचा – पावसाळ्यातील सर्वात धोकादायक आजार आहे कॉलरा, शरीरातील पूर्ण पाणी काही तासात शोषून हालत होते खराब)
१० वर्षानंतरचा बदल
ज्या व्यक्ती शारीरिक स्वरूपात अधिक सक्रिय होत्या, त्यांच्या शारीरिक कार्यात १० वर्षात बदल दिसून आला. कमी झोप घेतल्याने त्यांच्या शारीरिक प्रक्रियेत धीमेपणा आला. दरम्यान वयाच्या ५० ते ६० वर्षानंतर हा बदल अधिक प्रमाणात या अभ्यासानुसार दिसून आला आहे.
(वाचा – बायकोला चिकटून झोपण्याचे जबरदस्त फायदे, मानसिक आजारांपासून राहता दूर अभ्यासातून सिद्ध)
किमान ८ तास झोपेची आवश्यकता
आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर किमान ८ तासांपेक्षा अधिक झोपेची आवश्यकता शरीराला भासते. तुम्ही जर योग्य पद्धतीने झोपत नसाल तर त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो आणि तुम्ही केलेल्या व्यायामाचाही उपयोग होत नाही. शरीरात काही वर्षांनी बदल होऊन कामात ढीलेपणा येतोच.
[ad_2]