Dispute with mother in law daughter in law swallowed sulfas pills died in hospital;सासू-सुनेच्या भांडणाचा धक्कादायक शेवट, रुसलेल्या सूनेचा विषारी गोळी घेऊन मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dispute with mother in law: सासू-सुनेचं भांडण कोणत्याच घराला नवं नाही..घर म्हटलं की भांड्याला भांड लागतं..सासू आणि सून दोघींचे विचार वेगळे असतात,दोघांमध्ये पिढ्यांचं अंतर असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरच दोघींची सहमती होईल असे नसते. यातून खटके उडल्याचे प्रकार अनेक घरांमध्ये होत असतात. पण काही दिवसात ही भांडणं मिटून दोघीही संसारात गुंतून जातात. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेत सासू-सुनेच्या भांडणाचा असा शेवट होईल वाटलं नव्हतं. 

सासू आणि सून यांच्यात झालेल्या वादानंतर सुनेने धक्कादायक पाऊल उचलले आहे. दोघींमध्ये घरगुती किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर रुसलेल्या सुनेने सल्फासची गोळी खाल्ली. यानंतर घरात गोंधळ सुरु झाला. प्रचंड घाईगडबडीत तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण तोच दिवस सासुसोबतच्या भांडणाचा आणि आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला. उपचार घेत असताना रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला. गोपालगंजमधील भोरे पोलीस स्टेशन हद्दीतील जोरवणपूर गावात ही घटना घडली. 

घरगुती क्षुल्लक कारणावरुन वाद

जोरवानपूर गावातील रहिवासी कयामुद्दीन मियाँ यांची पत्नी अमीना खातून (28) आणि सासू यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान सासू तिच्या खोलीत जाऊन बसली. या गोष्टीचा सुनेला आणखीनच राग आला. संतापलेल्या सुनेने घरात ठेवलेल्या सल्फाच्या अनेक गोळ्या एका दमात  खाल्ल्या. 

गोळ्यांचा प्रभाव इतका होता की काही वेळातच ती बेशुद्ध पडली. खोलीत अमीना खातून बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून पती कायमुद्दीन मियाँ यांनी तिला भोरे रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले.

तिची प्रकृती गंभीर पाहून डॉक्टरांनी तिला चांगल्या उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर केले. दुसऱ्या रुग्णालयात तिच्यावर सुमारे दीड तास उपचार चालले. त्यानंतर अमिना यांचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीय शवविच्छेदन न करताच घरी निघून गेले.

पोलिसांना कळवले नाही

सल्फासची गोळी सेवन केल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडून ही माहिती मिळाली असली तरी महिलेच्या मृत्यूबाबत नातेवाईकांकडून पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यानंतर पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत, असे भोर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष सुरेंद्र यादव यांनी सांगितले. हत्येची कारणे शोधून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. 

Related posts