Somvati Amavasya 2023 : आज 57 वर्षांनंतर विशेष योगायोग! ‘या’ 6 राशींच्या नशिबात करोडपती होण्याचा सुवर्णयोग

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Deep/ Somvati Amavasya lucky zodiac signs : आज आषाढ अमावस्या म्हणजेच सोमवती, दीप आणि गतहारी, हरियाली अमावस्या आहे. तर मंगळवारपासून अधिक श्रावण मासला प्रारंभ होणार आहे. आज सोमवती आणि दीप अमावस्या असा योगायोग जुळून आला आहे. 57 वर्षांपूर्वी 18 जुलै 1966 ला हा दुर्मिळ योगायोग घडला होता. तर ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांचा विशेष संयोग तयार होतो आहे. ( Somvati Amavasya Deep Amavasya  lucky zodiac signs surya budh rahu ketu in same rashi rare yog after 57 years today horoscope)

ग्रहांचा राजकुमार सूर्यदेव कर्क राशीत गोचर केलं आहे. तर कर्क राशीत बुध आणि सूर्य मिलनाने 4 राजयोग तयार झाले आहे. राहू केतू मेष राशीत तर चंद्र मिथुन राशीत आहे. आज 57 वर्षांनी सूर्य, बुध, राहू आणि केतू ज्या राशीत होते त्याच राशीत पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे महिन्याभर 6 राशींसाठी पैसाच पैसा असणार आहे. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी पाहूयात. 

सिंह (Leo)

आज दीप आणि सोमवती अमावस्येला सिंह राशीच्या लोकांना महादेवाची कृपा बरसणार आहेत. करिअरमध्ये प्रगती आणि यशाचे मार्ग मोकळे होणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. तुम्ही बाहेर गावी जाण्याचे बेत आखणार आहेत. 

मेष (Aries)

या राशींसाठी सोमवती अमावस्या अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. पुढील महिनाभर त्यांना धनलाभाचे योग आहेत. शिवाय व्यवसायात फायदा होणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. 

वृषभ (Taurus)

सोमवती अमावस्या वृषभ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे. करिअरमधील सगळे अडथळे नाहीसे होणार आहेत. आर्थिक लाभामुळे बँक बॅलेन्स मजबूत होणार आहे. 

धनु (Sagittarius)

सोमवती अमावस्या किंवा दीप अमावस्या धनु राशीच्या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. अकडलेले पैसे तुमचे परत मिळणार आहे. मित्रांसोबत संबंध चांगले होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. 

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या धनलाभ घेऊन आला आहे. पुढील महिनाभर करिअरचा आलेख चढता असणार आहे. सुख समृद्धी घरात नांदणार आहे. उत्पन्नात घसघशीत वाढणार आहे. 

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही आजची अमावस्या अतिशय खास असणार आहे. समाजात तुमच्या मान सन्मान वाढणार आहे. आर्थिक संकट दूर होईल. अचानक धनलाभ होणार आहे. 

 

 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts