Kedarnath boy making Selfie video Near Helicopter News in Marathi;केदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला ‘प्रसाद’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Selfie Near Helicopter: सध्या आपण काय वेगळं करतोय हे सोशल मीडियात दाखवण्याचा ट्रेंड सुरु आहे. या स्पर्धेत कोणालाही मागे राहायचं नाहीय. काही मोजक्या लाइक्स आणि व्ह्यूजसाठी लोकं आपला जीव धोक्यात टाकतात. आजकालचे तरुण आपल्या डोळ्यांऐवजी मोबाईल फोनच्या लेन्समधून जग पाहत आहेत. मैफिली असो किंवा तीर्थयात्रा… माणसाला प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायची असते, जेणेकरून व्हिडिओ कसा तरी व्हायरल होतो आणि तो स्वतःला इन्फ्लूएंसर म्हणू लागतो. आजकाल सोशल मीडियावर एका तरुणाची क्लिप व्हायरल होत आहे. त्याने केदारनाथ हेलिपॅडवर व्हिडिओ सेल्फी व्हिडीओ बनविण्याचा प्रयत्न केला. याचे त्याला तात्काळ विनामूल्य ‘बक्षीस’ मिळाले!

हा व्हिडिओ इंस्टाग्राम,ट्विटरवर  शेअर केला जात आहे. ही क्लिप @GarryWalia_ ने मायक्रो-ब्लॉगिंग साइट ‘ट्विटर’ वर शेअर केली. ये जिंदगी में सेल्फी ना लेगा दोबारा, असे त्याला कॅप्शन दिले आहे. एक तरुण सेल्फी व्हिडिओ काढण्यासाठी हेलिपॅडजवळ आला. त्यादरम्यान हेलिकॉप्टर उडत होते. त्याचे फॅन वेगाने फिरत होते. पण हा तरुण व्हिडिओ बनवण्यात खूपच मग्न होता.

असे असताना ‘हेलिपॅड स्टाफ’च्या नजरेस ही घटना पडली. तो धावत त्या व्यक्तीजवळ पोहोचला आणि त्याला लाथा-बुक्क्यांनी मारु लागला. पण मुलगा हसत हसत तिथून पळू लागला. जणू काही लोक त्याला मारत नसून विनोद सांगत आहेत, असा त्याचा अविर्भाव होता. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर इंटरनेटवरील लोकांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. होय, या विषयावर सर्व यूजर्सनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले – सेल्फीनंतर फिफा वर्ल्ड कप. दुसऱ्याने लिहिले – आशीर्वाद मिळाले. त्याचवेळी एका व्यक्तीने सांगितले की, तो गरीब माणूस आहे, तो कधीच हॅलीकॉप्टरमध्ये बसू शकणार नाही, संधी मिळाली तर सेल्फी घेतोय, त्यात काही गैर नाही. त्यामुळे हे दृश्य पाहून काही लोक हसले. एका यूजरने तर लिहिलंय की, किक फिल्मी स्टाईलमध्ये आहे. 

Related posts